GT vs RCB : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीचं टीकाकारांना सणसणीत उत्तर

Virat Kohli GT vs RCB : विराट कोहलीवर स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरुन सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र गुजरात विरुद्ध 70 धावा केल्यानंतर विराटने सर्वकाही बोलून टाकलं.

GT vs RCB : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीचं टीकाकारांना सणसणीत उत्तर
virat kohli gt vs rcb,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 8:40 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 45 व्या सामन्यात 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. आरसीबीने विजयासाठी मिळालेलं 201 धावांचं आव्हान हे 1 विकेट गमावून 16 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. आरसीबीला 40 धावांवर पहिला झटका लागला. फाफ डु प्लेसीस 24 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर विल जॅक्स आणि विराट कोहली या दोघांनी 166 धावांची विजयी भागीदारी केली. विल जॅक्स याने सिक्स ठोकून शतक पूर्ण केलं. जॅक्सने या सिक्ससह आरसीबीचा विजय झाला. जॅक्सने 41 बॉलमध्ये नॉट आऊट 100 रन्स केल्या. तर विराट कोहलीने 44 बॉलमध्ये 70 धावा केल्या.

आरसीबीचा हा या हंगामातील हा एकूण तिसरा तर सलग दुसरा विजय ठरला. विराटने 159 च्या स्ट्राईक रेटने 70 धावांची खेळी केली. विराटने या विजयानंतर अनेक मुद्द्यांवरुन प्रतिक्रिया दिली. विराटवर गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने स्ट्राईक रेटवरुन टीका करण्यात आली. विराटने याबाबतही प्रतिक्रिया दिली. तसेच विल जॅक्सच्या अप्रतिम शतकाबाबतही दिलखुलासपणे बोलला. विराटने नक्की काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

विराट काय म्हणाला?

“दुसऱ्या बाजूने विल जॅक्सचा खेळ पाहताना मला आनंद झाला. आम्ही 19 ओव्हरमध्ये जिंकू असं वाटत होतं. पण 16 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला. हा सर्वोत्तम प्रयत्न होता. विल जॅक्सचं शतक हे आतापर्यंत मी टी 20 मध्ये पाहिलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक होतं. विलची खेळी पाहताना मला आनंद झाला”, असं विराटने म्हटलं.

“जे लोक स्ट्राइक रेटबद्दल बोलतात आणि मी स्पिन चांगला खेळत नाही ते सगळेच या गोष्टीबद्दल बोलत आहेत. तुम्ही त्या परिस्थितीत नसाल तर, गेमबद्दल बोलणं, त्याबाबात दिवसेंदिवस बोलू शकतात. पण ज्यांनी दररोज प्रयत्न केले आहेत, त्यांना माहितीय की काय होतं. ही माझ्यासाठी एक आठवण आहे”, असंही विराटने नमूद केलं. विराटवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्ट्राईक रेटवरुन टीका केली जात आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद आणि मोहित शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.