IPL 2024, KKR vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचं कोलकात्यासमोर 162 धावांचं आव्हान

आयपीएल 2024 स्पर्धेतील 28वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल कौलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला. तसेच लखनौ फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. लखनौने 20 षटकात गडी गमवून धावा केल्या.

IPL 2024, KKR vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचं कोलकात्यासमोर 162 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 5:22 PM

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 7 गडी गमवून 161 धावा केल्या.  कोलकात्यासमोर विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली. पहिल्या दोन चेंडूवर क्विंटन डी कॉकने चौकार मारले. तसेत कोलकात्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र क्विंटन डीकॉकची ही खेळी फार काळ टिकली नाही. 10 धावा करून वैभव अरोराच्या गोलंदाजीवर बाद झाला. दीपक हूडाही काही खास करू शकला नाही 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि आयुष बदानी यांनी 37 धावांची भागीदारी केली. पण केएल राहुल मोठा फटका मारताना चुकला आणि रस्सेलच्या गोलंदाजीवर रमनदीपने सिंगने झेल पकडला. त्याचा डाव 39 धावांवर आटोपला आहे. त्यानंतर मार्कस स्टोइनिसकडून बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र काही खास करू शकला नाही. 5 चेंडूंचा सामना करून 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा करून बाद झाला.

आयुष बदोनीची डावही 29 धावांवर आटोपला. त्याने 27 चेंडूत 29 धावांची खेळी केली. यात दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या यांनी मोर्चा सांभाळला. निकोलस पूरनने आक्रमक खेळीचं प्रदर्शन केलं. 32 चेंडूत 45 धावा केल्या आणि मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. अर्शद खान क्विंटन डीकॉकच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरला. मात्र 4 चेंडूत 5 धावा केल्या आणि स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. कृणाल पांड्या 7 धावा करून नाबाद राहीला.

कोलकात्याकडून मिचेल स्टार्क सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 28 धावा देत 3 गडी बाद केले. तर वैभव अरोरा, सुनील नरीन, वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णदार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.