AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, KKR vs SRH : 24.75 कोटींचा मिचेल स्टार्क कोलकात्याला पडला महागात, पहिल्याच सामन्यात फूसsss

आयपीएल मिनी लिलावात सर्वाधिक बोली लावून कोलकात्याने मिचेल स्टार्कला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 24.75 कोटींची बोली लावली. त्यामुळे निश्चितच त्याच्याकडून अपेक्षा असणारच आहे. मिचेल स्टार्कने पहिल्या सामन्यात महागडा ठरला. कशी टाकली 4 षटकं ते जाणून घ्या

IPL 2024, KKR vs SRH : 24.75 कोटींचा मिचेल स्टार्क कोलकात्याला पडला महागात, पहिल्याच सामन्यात फूसsss
IPL 2024, KKR vs SRH : कोट्यवधींची बोली लावलेला मिचेल स्टार्क पहिल्याच सामन्यात फेल, वाचा किती धावा दिल्याImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 23, 2024 | 11:27 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबाद यांच्या बाजूने लागला. कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. कोलकात्याने 20 षटकात 7 गडी गमवून 208 धावा केल्या. तसेच विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं.आंद्रे रसेलने 25 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. यात 3 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. कोलकात्याने मोठी धावसंख्या उभारल्याने गोलंदाजांचं काम सोपं झालं होतं. मिचेल स्टार्क आणि इतर गोलंदाजांमुळे सामना आपल्या पारड्यात पडला होता. मिचेल स्टार्ककडून तशा खूप अपेक्षा होत्या. मात्र पहिल्याच सामन्यात मिचेल स्टार्कचं पितळ उघडं पडलं. चार षटकात 53 धावा दिल्या.

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिलं षटक मिचेल स्टार्कला सोपवलं. पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले आणि तिसरा चेंडू वाइड टाकत पाच धावा दिल्या. त्यामुळे तिसरा चेंडू पुन्हा टाकण्याची वेळ आली. चौथ्या चेंडूवर 2 धावा, पाचव्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. पहिल्या षटकात मिचेल स्टार्कने एकही विकेट न घेता 12 धावा दिल्या.

संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा मिचेल स्टार्कला सोपवलं. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 4, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवर एक धाव आणि सहाव्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या षटकात एकही विकेट न घेता 10 धावा दिल्या.

मिचेल स्टार्क पुन्हा एकदा डेथ ओव्हरमध्ये परतला. त्याला 16 वं षटकं आणि त्याचं वैयक्तिक तिसरं षटक सोपवलं. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवर 1 धाव आणि सहाव्या चेंडूवर 1 धाव आली. तिसरं षटकं चांगलं पडलं. स्टार्कने बिनबाद 5 धावा दिल्या.

संघाचं 19 वं षटक मिचेल स्टार्कला सोपवलं 12 चेंडूत 39 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरच क्लासनने षटकार ठोकला. दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तिसरा चेंडू वाइड टाकला. तिसरा चेंडू परत टाकत क्लासेनने षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आला. पाचव्या चेंडूवर एक धाव आली. सहाव्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आला. चौथ्या षटकात एकूण 26 धावा दिल्या.

पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.