CSK vs LSG : जडेजाचं अर्धशतक, धोनीचा फिनीशिंग टच, चेन्नईकडून लखनऊला विजयासाठी 177 धावांचं आव्हान

IPL 2024 LSG vs CSK 1st Innings Highlights In Marathi : महेंद्रसिंह धोनीने रवींद्र जडेजा याच्या सोबतीने लखनऊ विरुद्ध शानदार 28 धावांची नाबाद खेळी केली.

CSK vs LSG : जडेजाचं अर्धशतक, धोनीचा फिनीशिंग टच, चेन्नईकडून लखनऊला विजयासाठी 177 धावांचं आव्हान
dhoni and jadeja ipl 2024 csk,
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 9:47 PM

चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात विजयसाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक धावा केल्या. जडेजाने 40 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरसह नाबाद 57 धावा नाबाद केल्या. तर महेंद्रसिंह धोनीने फिनीशिंग टच दिला. धोनीने 311.11 च्या स्ट्राईक रेटने 2 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 28 धावांचं योगदान दिलं. मोईन अलीने जडेजाला चांगली साथ दिली. मोईनने 20 बॉलमध्ये 30 रन्स धावा जोडल्या. मोईनच्या या खेळीत 3 सिक्सचा समावेश होता. ओपनर अजिंक्य रहाणे 24 बॉलमध्ये 5 चौकार आणि 1 षटाकारांसह 36 धावांची खेळी केली. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 13 बॉलमध्ये 17 धावा केल्या. तर रचीन रवींद्र, शिवम दुबे आणि समीर रिझवी अपयशी ठरले. रचीन 0, शिवम 3 आणि रिझवी 1 धाव करुन माघारी परतले.

चेन्नई भागीदारी करण्यात अपयशी

लखनऊने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र चेन्नईला या संधीचा फायदा घेऊन आणखी मोठी धावसंख्या करता आली नाही. लखनऊच्या गोलंदाजांनी चेन्नईला तसं करण्यापासून रोखलं. लखनऊने चेन्नईला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे चेन्नईला सहाव्या विकेटचा अपवाद वगळता इतर कोणत्याही विकेटसाठी मोठी भागीदारी करता आली नाही. मोईन अली आणि रवींद्र जडेजा या दोघांनी या सामन्यात चेन्नईसाठी सर्वात मोठी भागीदारी केली. जडेजा आणि मोईन अली या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. मोईन अलीने या भागीदारी दरम्यान सलग 3 सिक्स खेचले.

लखनऊची बॉलिंग

दरम्यान लखनऊकडून एकूण 6 गोलंदाजांनी बॉलिंग केली. त्यापैकी 5 जणांनी विकेट घेतल्या. तर मॅट हॅनरी विकेट घेण्यात अपयशी ठरला. लखनऊकडून कृणाल पंड्या याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मोहसिन खान, यश ठाकुर, रवी बिश्नोई आणि मार्क्स स्टोयनिस या चौघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पाथीराना.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकुर.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.