MI vs DC, IPL 2024 : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने, हार्दिक पांड्या म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. कौल जिंकताच हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच प्लेइंग 11 बाबत सांगून टाकलं.

MI vs DC, IPL 2024 : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने, हार्दिक पांड्या म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 3:08 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 43वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांना तितकाच महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली प्लेऑफची रेस पाहता विजय किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडत आहेत. यापूर्वी वानखेडेवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 29 धावांनी बाजी मारली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स वरचढ ठरते की, मुंबई इंडियन्स बाजी मारते याची उत्सुकता आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.  ग्राउंड छोटं असल्याचं कारण देत हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मैदान लहान आहे. लहान मैदानावर दुसरी फलंदाजी करणे चांगले ठरेल. प्रत्येक खेळ हा नवा खेळ असतो. आम्ही लढत राहतो आणि प्रत्येक गेममध्ये कठोरपणे येत राहतो. मूड ठीक आहे, आनंदी गप्पा, सर्व ठीक आहे. भूतकाळात काय घडले आहे यावर आपण लक्ष केंद्रित करायची गरज नाही. कोणीही कोणालाही हरवू शकतो. आमचा ब्रँड क्रिकेट खेळणे आणि आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकणे हे आमचे ध्येय आहे. संघात एक बदल केला आहे.”

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितलं की, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. मला वाटतं की दुसऱ्या डावात धावांचा वेग कमी होईल. हे आश्चर्यकारक आहे, आम्हाला हवे तसे विकेट मिळत आहेत. एक संघ म्हणून आम्हाला चांगले खेळायचे आहे आणि आम्ही कर आहोत.नवीन चेंडूने गोलंदाजी करणे आणि डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे कठीण आहे. येथे एक ओव्हर किंवा तिकडे सर्व फरक पडतो. संघात फक्त एक बदल केला आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....