AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RR : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, हार्दिकच्या नेतृत्वात पुन्हा फेल

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सलग तिसरा पराभव पाहिला आहे. या पराभवामुळे मुंबईचं स्पर्धेतील आव्हान आणखी खडतर झालं आहे. तर राजस्थान रॉयल्सने स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवून अव्वल स्थान गाठलं आहे. तर मुंबईला या पराभवासह शेवटच्या स्थानावरच राहावं लागलं आहे.

MI vs RR : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, हार्दिकच्या नेतृत्वात पुन्हा फेल
MI vs RR : राजस्थानने मुंबईला पाजलं पराभवाचं पाणी, तिसऱ्या पराभवामुळे प्रवास आणखी खडतर
| Updated on: Apr 01, 2024 | 11:08 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला आणखी वाट पाहावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सला होमग्राउंड वानखेडेही तसं भावलं नाही. मुंबईला विजयासाठी आणखी एका सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. मुंबईचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव असून शेवटच्या स्थानावर आहे. आता मुंबईला साखळी फेरीत 10 सामने खेळायचे असून पुढील प्रवास आणखी खडतर होणार आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने, दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आणि आता तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पराभवाचं पाणी पाजलं आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 125 धावा केल्या आणि विजयासाठी 126 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 4 विकेट्स गमवून 15.3 षटकात पूर्ण केलं.

मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. इतकंच काय तर आघाडीचे तीन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस शून्यावर बाद झाले. इशान किशनही काही खास करू शकला नाही. अवघ्या 16 धावा करून बाद झाला. तर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने चांगली फलंदाजी केली. पण संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाऊ शकले नाहीत. हार्दिक पांड्याने 34, तर तिलक वर्माने 32 धावा केल्या. टिम डेविड 17, पियुष चावला 3, गेराल्ड कोएत्झी 4 धावा करून तंबूत परतले. दुसरीकडे, राजस्थानकडून रियान परागने 39 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावांची खेळी केली. तर मुंबईच्या आकाश मढवाल आणि क्वेना मफाका वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. जसप्रीत बुमराहने 4 षटकं टाकली मात्र त्यालाही यश मिळालं नाही.

राजस्थान रॉयल्सचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्सने अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दिशेने रॉयल चॅलेंजर्स मार्ग आणखी सोपा होत चालला आहे. राजस्थान रॉयल्सचे 6 गुण झाले असून रनरेटही चांगला झाला आहे. तर मुंबई इंडियन्सच्या रनरेटवर प्रभाव पडला आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात 0 गुण असून नेट रनरेट हा -1.423 इतका आहे.  याचाच अर्थ असा की मुंबईचं या स्पर्धेतील आव्हान खडतर होत चाललं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

Follow Us
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश.
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत.
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं....
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं.....
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल..
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल...
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?.
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच...
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच....
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे.
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ.
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत...
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत....
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार.