IPL 2024 : पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्सची धुरा या खेळाडूच्या खांद्यावर! कशी असेल रणनिती जाणून घ्या

आयपीएल 2023 स्पर्धेत क्वॉलिफायर 2 फेरीतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं आहे. पण असं असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

IPL 2024 : पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्सची धुरा या खेळाडूच्या खांद्यावर! कशी असेल रणनिती जाणून घ्या
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सची आतापासूनच तयारी, कर्णधारपदासाठी या खेळाडूची होणार निवडImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 9:20 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं आहे. 2021, 2022 आणि 2023 हे वर्ष मुंबई इंडियन्ससाठी खूपच जड गेली. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रोहित शर्माने 2023 या सिझनमध्ये 20.75 च्या सरासरीने 332 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 132.80 इतकाच होता. तसेच गेल्या चार सिझनमध्ये रोहित शर्माला 400 धावांचा आकडाही गाठता आला नाही.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच जेतेपद पटकावून दिली आहेत. त्यामुळे फ्रेंचाईसीने त्याला तीन संधी दिल्याचं बोललं जात आहे रोहित शर्माचं वय आता 36 असून मुंबई इंडियन्स आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. मुंबईला तारू शकेल अशा खेळाडूची यासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी तरूण आणि मुंबईला पुढे घेऊन जाणाऱ्या खेळाडूंच्या नावाची चर्चा रंगली आहे.

सध्या सूर्यकुमार यादवकडे मुंबईच्या उपकर्णधारपदाची धुरा आहे. मात्र त्याचं वय पाहता त्याच्याकडे कर्णधारपद सोपवणं तसं कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्माऐवजी संघाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह किंवा तरुण खेळाडू असलेल्या ईशान किशनकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. ईशान किशनने अंडर 19 भारतीय संघाचं 2016 मध्ये नेतृत्व केलं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये जेतेपद पटकावलं आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल इतिहासात नकोसा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर या स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

रोहित शर्माचा फॉर्म पाहता काही माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली आहे. इतकंच काय त्याला आराम देण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स पुढच्या हंगामात रोहित शर्माला रिलीज करण्याची करण्याची शक्यता आहे.

सध्याचा मुंबईचा संघ

रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.