AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खेळणार मुंबई इंडियन्स, अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव पार पडला आहे. कोट्यवधी रुपयांची उधळण करत खेळाडूंची खरेदी विक्री झाली आहे. आता प्रत्येक संघांची बांधणी पूर्ण झाली असून प्लेइंग इलेव्हनबाबत अंदाज बांधला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच उतरणार आहे. पण प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत अंदाज वर्तवला जात आहे.

IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खेळणार मुंबई इंडियन्स, अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
IPL 2024 : हार्दिक पांड्या या 11 खेळाडूंवर ठेवणार भरवसा! जाणून घ्या मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनबाबत
| Updated on: Dec 22, 2023 | 5:07 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेसाठी आता जोरदार तयारी झाली आहे. मिनी लिलावानंतर खेळाडूंचा चमू तयार झाला आहे. त्यामुळे संघात असलेल्या खेळाडूंची क्षमता पाहून आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्या हार्दिक पांड्यासाठी डील झाली. मुंबईने मोठी रक्कम मोजत हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतलं. तसेच रोहित शर्माकडून कर्णधारपदाची माळ थेट हार्दिकच्या गळ्यात घातली. त्यामुळे हार्दिक नेतृत्व करणार हे स्पष्ट झालं. दुसरीकडे, मिनी लिलावात मुंबई इंडियन्से 8 खेळाडू खरेदी केले.जेराल्ड कोएत्झीसाठी मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 कोटींची रक्कम मोजली.त्याचबरोबर मदुशंका, श्रेयस गोपाळ, मोहम्मद नबी या सारखे खेळाडूंचा समावेश आहे. 2024 पर्वात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात रोहित शर्मा खेळणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या कोणत्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार याची उत्सुकता आहे.

अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा आणि इशान किशन ओपनिंग करतील. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी उतरेल. तर चौथ्या स्थानावर तिलक वर्मा आणि पाचव्या स्थानावर टिम डेविड फलंदाजीसाठी उतरेल. कर्णधार हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर उतरेल आणि फिनिशरची भूमिका बजावेल. तर रोमानिया शेफर्ड सातव्या स्थानावर उतरेल. त्यानंतर गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, श्रेयश गोपाळ आणि पियुष चावला खेळताना दिसतील. कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या गोलंदाजीवर जास्त भर देताना दिसेल.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्झी, जसप्रित बुमराह, श्रेयस गोपाळ, पियुष चावला.

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

  • विकेटकीपर- इशान किशन, विष्णु विनोद
  • फलंदाज – रोहित शर्मा, टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, डेवॉल्ड ब्रेविस
  • अष्टपैलू- हार्दिक पांड्या, रोमारियो शेफर्ड, नेहल वढेरा, शम्स मुलानी, गेराल्ड कोएत्झी, मोहम्मद नबी, शिवालिक वर्मा, नमन धीर
  • गोलंदाज – जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडोर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, अर्जून तेंडुलकर, पियुष चावला, दिलशान मदुशंका, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाळ.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.