AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान शंकरानंतर राम-कृष्णाच्या भक्तीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार, हार्दिक पांड्याच्या भजनाचा व्हिडिओ व्हायरल

IPL 2024: आयपीएलमध्ये हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. तो प्रथमच या संघाचे नेतृत्व करत आहे. क्रुणाल लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे. गेल्या हंगामात तो केएल राहुलच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत होता, मात्र यावेळी संघ व्यवस्थापनाने त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवले आहे.

भगवान शंकरानंतर राम-कृष्णाच्या भक्तीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार, हार्दिक पांड्याच्या भजनाचा व्हिडिओ व्हायरल
भजन गाताना हार्दिक आणि कृणाल पांड्या
Updated on: Apr 10, 2024 | 7:47 AM
Share

पांड्या बंधू सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. हार्दिक पांड्या अन् कृणाल पांड्या आपआपल्या संघाकडून खेळत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या संघाच्या सलग तीन पराभवानंतर भगवान शंकराच्या मंदिरात गेला. सोमनाथ मंदिरात पूजा केली. रुद्राभिषेक केला. त्यानंतर चौथ्या सामन्यात मुंबईचा संघ विजयी झाला होता. आता हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या (Hardik Pandya and Krunal Pandya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात दोन्ही भाऊ राम-कृष्ण भक्तीत रंगलेले दिसत आहेत. पारिवाराच्या कार्यक्रमात दोन्ही बंधू हरे रामा… हरे कृष्णा… भजन भजन गातांना दिसत आहेत. दोघांनी डिजायनर कुर्ता परिधान केला आहे. सोबत मित्र अन् परिवारातील लोक दिसत आहेत.

त्यानंतर मुंबईचा झाला विजय

मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पांड्याला हुटिंगचा सामना करावा लागत आहे. कर्णधारपद मिळाल्यानंतर अनेक गोष्टी हार्दिक पांड्यासाठी अनुकूल झाल्या नाहीत. आयपीएल २०२४ मध्ये सलग तीन सामन्यात पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्या भगवान शंकरास शरण गेले होते. प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा-अर्चना केली होती. त्यानंतर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता. त्यानंतर सोशल मीडियात युजर्सने म्हटले होते की, भगवानच्या शरणमध्ये जाणे हार्दिकला लाभदायक ठरले.

व्हिडिओत आहे काय

पांड्या ब्रदर्स यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन्ही जण भजन गात आहेत. भक्तीत तल्लीन झाले आहे. हा व्हिडिओ कोणत्या कार्यक्रमातील आहे, हे स्पष्ट झाले नाही. व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच आणि क्रुणाल पांड्याची पत्नी पंखुडी भजन गातांना मंत्रमुग्ध झालेले दिसत आहेत. यावेळी क्रुणाल आणि पंखुडी त्यांच्या मुलगा कवीर याला कडेवर घेऊन झुमताना दिसत आहेत.

आयपीएलमध्ये हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. तो प्रथमच या संघाचे नेतृत्व करत आहे. क्रुणाल लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे. गेल्या हंगामात तो केएल राहुलच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत होता, मात्र यावेळी संघ व्यवस्थापनाने त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवले आहे. कृणालची सुरुवातीची कामगिरीही फारशी प्रभावी झाली नव्हती. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये कृणालच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. त्याने बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघाबद्दल बोलायचे तर, लखनौ सुपरजायंट्सने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून आपली क्षमता सिद्ध केली आहे.

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान.
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.