IPL 2024 Point Table : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्स टॉपला, पुढची रेस अशी असणार

आयपीएल 2024 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मुस्तफिझुर रहमानची गोलंदाजी भेदक ठरली. बंगळुरुने या पराभवासह पहिल्या फेरीत तळाशी पोहोचला आहे. जसजसे सामने पुढे सरकतील तसतसं वरखाली होत राहणार आहे.

IPL 2024 Point Table : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्स टॉपला, पुढची रेस अशी असणार
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 12:05 AM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाटची 174 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरु केली आहे. मागच्या पर्वात चेन्नईने जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात 2 गुणांची भर पडली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची झोळी पहिल्या फेरीत रिती राहिली आहे.  दोन गुणांसह चेन्नई सुपर किंग्सला दोन गुणांसह +0.779 रनरेट मिळाला आहे. तर बंगळुरुची हीच उलटी स्थिती असून -0.779 रनरेट आहे.

आयपीएल 2023  स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी घेत 133 धावांचं आव्हान दिलं होतं. पण गुजरातने चेन्नईला 7 गडी आणि 5 चेंडू राखून पराभूत केलं होतं. त्यामुळे पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.

संघसामनेविजय पराजयनेट रनरेटगुण
राजस्थान रॉयल्स330+1.249 6
कोलकाता नाईट रायडर्स220+1.0474
चेन्नई सुपर किंग्स 3210.9764
गुजरात टायटन्स321-0.7384
सनरायझर्स हैदराबाद312+0.2042
लखनऊ सुपर जायंट्स2110.0252
दिल्ली कॅपिटल्स212-0.016 2
पंजाब किंग्स3120.3372
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु312-0.7112
मुंबई इंडियन्स 303-1.4230

आयपीएलच्या 16 व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सने  14 पैकी 8 सामने जिंकले होते. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं होतं. तर एक सामना न झाल्याने प्रत्येकी एक गुण मिळाला होता. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोघांना प्रत्येकी एक गुण वाटून दिला होता. चेन्नई सुपर किंग्सचे 17 गुण होते. तसेच प्लेऑफमध्ये गुजरात जायंट्सला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तसेच अंतिम फेरीत गुजरातला पराभूत करत जेतेपदावर नावही कोरलं.

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना झाला होता. हा सामना बंगळुरुने 8 गडी आणि 22 चेंडू राखून जिंकला होता. स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची स्थिती मागच्या पर्वात निराशाजनक राहिली होती. 14 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून संघ सहाव्या स्थानी होता. त्यामुळे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. प्लेऑफला जाण्याचं गणितही किचकट झालं होतं. मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे 14 गुण होते.

आयपीएल 2023 स्पर्धेतील गुणतालिकेवर नजर टाकली तर एकूण 14 सामने खेळत गुजरात जायंट्सचे 20 गुण, चेन्नई सुपर किंग्सचे 17 गुण, लखनौ सुपर जायंट्सचे 17 गुण, मुंबई इंडियन्सचे 16 गुण, राजस्थान रॉयल्सचे 14, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे 14 गुण, कोलकाता नाईट रायडर्सचे 12 गुण, पंजाब किंग्सचे 12 गुण, दिल्ली कॅपिटल्सचे 10 गुण आणि सनरायझर्स हैदराबादचे 8 गुण होते.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....