AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 RR vs RCB Live Streaming : बंगळुरुसमोर राजस्थानचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Streaming : राजस्थान या हंगामात आतापर्यंत एकही सामन्यात पराभूत झालेली नाही. त्यात राजस्थान आपला पुढील सामना हा होम ग्राउंडमध्ये खेळणार आहे. त्यामुळे बंगळुरुसमोर मोठं आव्हान असणार आहे.

IPL 2024 RR vs RCB Live Streaming : बंगळुरुसमोर राजस्थानचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान
sanju samson and faf du plessis ipl
| Updated on: Apr 05, 2024 | 3:45 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 19 व्या सामन्यात स्पर्धेतील अजिंक्य असलेली राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आमनासामना होणार आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत संजू सॅमसन याच्या नेतृत्वात खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला 4 सामने खेळलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फक्त 1 मॅचच जिंकता आली आहे. तर 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे बंगळुरुसमोर दुसरा विजय मिळवून राजस्थानचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना केव्हा?

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना शनिवारी 6 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना कुठे?

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना किती वाजता सुरु होणार?

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

राजस्थान टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

बंगळुरु टीम : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल विल लोमर, जॅक्स, कॅमेरॉन ग्रीन, टॉम कुरन, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.