कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही… श्रेयस अय्यर याने आपले दु:ख मांडत केला गौप्यस्फोट

ipl 2024 final match: भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 124 सामन्यांमध्ये 4000 हून अधिक धावा करणाऱ्या श्रेयसने सांगितले की, भूतकाळावर लक्ष देण्याऐवजी आपल्या लक्ष्याकडे लक्ष केंद्रित करणे चांगले आहे. आयपीएल जवळ येत असल्यामुळे आम्ही योजना आणि रणनीती अंमलात आणली आणि ती यशस्वी ठरली.

कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही... श्रेयस अय्यर याने आपले दु:ख मांडत केला गौप्यस्फोट
shreyas iyer
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 7:48 AM

विश्वचषक 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात श्रेयस अय्यरची भूमिका सर्वात महत्वाची होती. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यात श्रेयस अय्यर आघाडीवर होता. विश्वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्यात श्रेयस अय्यर आहे. त्याने 11 सामन्यात 530 धावा त्याने केल्या. परंतु विश्वचषकानंतर श्रेयस अय्यरसाठी कठीण काळ आला. त्याच्या मागे पाठीचे दुखणे लागले. त्याला कसोटी स्पर्धेतून बाहेर राहावे लागले. त्यानंतर रणजी करंडक स्पर्धेचा एक सामना न खेळल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला करारातून बाहेर ठेवले आहे.

लोक विश्वास ठेवत नव्हते

आयपीएल 2024 अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी श्रेयस अय्यर याने माध्यमाशी संवाद साधला. कोलकाता नाइट राइडर्सचा कर्णधार असलेला अय्यर विजेतेपद मिळण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. अय्यर म्हणाला, दीर्घकाळापासून माझे पाठीचे दुखणे सुरु होते. परंतु माझ्या पाठीच्या दुखापतीवर लोक विश्वास ठेवत नव्हते. विश्वचषक स्पर्धेनंतर मी निश्चितच संघर्ष करत होतो. मी माझी चिंता जाहीर केली पण कोणी विश्वास ठेवला नाही. अय्यर याचे हे उत्तर म्हणजे बीसीआयला टोला असल्याचे समजले जात आहे.

रणनीती ठरली यशस्वी

माझे दुखणे सुरु होते आणि आयपीएलजवळ येत होती. त्यामुळे मी आयपीएलवर लक्ष केंद्रीत केले. आयपीएलमध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करता येईल, यासाठी माझी तयारी सुरु होती. आम्ही जी रणनीती बनवली, ती यशस्वी झाली. एक फलंदाज म्हणून लाल चेंडूवरुन पांढऱ्या चेंडूवर येणे अवघड असते. परंतु तुम्हाला सवय झाली म्हणजे तुम्ही सर्व सांभाळून घेतात.

हे सुद्धा वाचा

भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 124 सामन्यांमध्ये 4000 हून अधिक धावा करणाऱ्या श्रेयसने सांगितले की, भूतकाळावर लक्ष देण्याऐवजी आपल्या लक्ष्याकडे लक्ष केंद्रित करणे चांगले आहे. आयपीएल जवळ येत असल्यामुळे आम्ही योजना आणि रणनीती अंमलात आणली आणि ती यशस्वी ठरली. श्रेयस अय्यर कोलकाता नाइट राइडर्सचे मेंटॉर गौतम गंभीरसोबत आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवण्याठी सज्ज आहे.

Non Stop LIVE Update
भीषण रेल्वे अपघात, एक्सप्रेसला मालगाडीची धडक, अनेक बोगी उलटल्या अन्...
भीषण रेल्वे अपघात, एक्सप्रेसला मालगाडीची धडक, अनेक बोगी उलटल्या अन्....
कोकणात महायुतीतच बॅनर वॉर..बाप, कुत्ता, झुंड अन हिसाब; काय झळकले बॅनर?
कोकणात महायुतीतच बॅनर वॉर..बाप, कुत्ता, झुंड अन हिसाब; काय झळकले बॅनर?.
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.