AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, SRH vs RCB : आरसीबी हैदराबादला पराभूत करणार का? या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

आयपीएल 2024 स्पर्धेतील 41 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. सनरायझर्स हैदराबादची स्पर्धेतील स्थिती एकदम जबरदस्त आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यात कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील ते..

IPL 2024, SRH vs RCB : आरसीबी हैदराबादला पराभूत करणार का? या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 24, 2024 | 4:09 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हैदराबादने बंगळुरुला 25 धावांना पराभूत केलं होतं. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादची बाजू एकदम भक्कम आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. बंगळुरुला 8 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. हैदराबादने या स्पर्धेत तीनवेळा 250 अधिक धावसंख्या केली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यात हैदराबादने 13 वेळा, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 वेळा विजय मिळवला आहे. एका सामना निकालाविना सुटला आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून सात, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 4 खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात. सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड सर्वोत्तम फलंदाज ठरू शकतो. तर गोलंदाजीत टी नटराजन हा सर्वोत्तम गोलंदाज ठरू शकतो. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेन, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स आणि टी नटराजन चांगले खेळाडू ठरतील. तर बंगळुरुकडून फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, विल जॅक्स आणि रीसी टोपले यांच्यावर मदार असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर धावांचा डोंगर रचला जावू शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. दवबिंदू अधिक प्रमाणात पडत असल्याचं दिसल्यास गोलंदाजी स्वीकारली जाईल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यूके), नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (सी), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट. इम्पॅक्ट प्लेयर्स : टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल इम्पॅक्ट प्लेयर्स : सुयश प्रभुदेसाई.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.