IPL मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांशी भिडले, हेड-मॅक्सवेलमध्ये भांडण, स्टोइनिसची वादात उडी, व्हिडिओ…
Ipl 2025: आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांशी भिडले. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या या सामन्यादरम्यान ही घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात जोरदार वाद झाला.

Ipl 2025: आयपीएल 2025 चा 27वा सामना चांगलाच रोमहर्षक झाला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पंजाब किंग्सवर 8 गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात क्रिकेट रसिकांना चांगलीच फटकेबाजी पाहण्यास मिळाली. सनरायझर्स हैदराबादने मोठ्या धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. पंजाब किंग्सने 20 षटकांत 6 गडी गमवून 245 धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी 246 धावांचे तगडे आव्हान हैदराबादने अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या फटकेबाजीमुळे सहज पेलले. सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात 1 गडी गमवून विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात मोठा रन चेज होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्येच भांडण झाले.
ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांशी भिडले
आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांशी भिडले. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या या सामन्यादरम्यान ही घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात जोरदार वाद झाला. ही घटना सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या नवव्या षटकात घडली. त्या षटकात ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजी करत होता. त्याचे हे षटक खूप महागडा ठरले. ट्रॅव्हिस हेड याने मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारले. त्यानंतर मॅक्सवेल याचा संताप अनावर झाला. त्याने संतापात चेंडू हेडकडे फेकला. यानंतर दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले.
Heat moment between Glenn Maxwell and Travis Head.
📸: @StarSportsIndia | #SRHvPBKS pic.twitter.com/bjPnOPyhms
— CricAsh (@ash_cric) April 12, 2025
सामन्यानंतर काय झाले?
मॅक्सवेल याच्या षटकानंतर मार्कस स्टोइनिस हा या वादात आला. तो आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेलसोबत पंजाब किंग्जकडून खेळत आहे. ट्रॅव्हिस हेडशी बोलताना दिसला. पण हे मैदानावरील भांडण लवकरच संपले. सामन्यानंतर हेड याने या लढतीवर एक विधानही केले. ट्रॅव्हिस हेड म्हणाला, सहकाऱ्यांविरुद्ध खेळणे नेहमीच मजेदार असते. ती थोडी मैत्रीपूर्ण लढत होती.
ट्रॅव्हिस हेड याने या सामन्यात 33 चेंडूत 66 धावा करून संघाला दमदार सुरुवात दिली. त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे संघ विजयाच्या जवळ आला. त्यानंतर अभिषेक शर्मा याने 141 धावांची धुवांधार खेळी केली. त्यामुळे एसआरएचने 246 धावांचे लक्ष्य 9 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.
