GT vs MI : मुंबईची क्वालिफायर 2 मध्ये धडक, गुजरातचा एलिमिनेटरमध्ये 20 रन्सने धुव्वा, 2 पराभवांचा हिशोब क्लिअर
Gujarat Titans vs Mumbai Indians Eliminator IPL 2025 Match Result : मुंबई इंडियन्सने मुल्लानपूरमधील स्टेडियममध्ये गुजरात टायटन्सला विजयासाठी 229 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र मुंबईने गुजरातला रोखलं आणि विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली आहे. मुंबईने रंगतदार झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला आहे. मुंबईने गुजरातला विजयासाठी 229 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुजरातला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 208 रन्सच करता आल्या. साई सुदर्शन याने जोरदार झुंज देत गुजरातच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र मुंबईने निर्णायक क्षणी सामन्यात कमबॅक केलं. पलटणने मोक्याच्या क्षणी वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन या दोघांना बाद केलं. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना योग्य वेळेस आऊट केलं आणि विजयापासून पद्धतशीर दूर ठेवलं.
गुजरातची बॅटिंग
मुंबईने 229 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. ट्रेंट बोल्टने कॅप्टन शुबमन गिल याला 1 रनवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यानंतर साई सुदर्शन आणि कुसल मेंडीस जोडी चांगलीच जमली होती. मात्र कुसल मेंडीस याने पायावर धोंडा मारला. कुसल हिट विकेट झाला आणि मुंबईला गिफ्टमध्ये आपली विकेट दिली. कुसलने 20 रन्स केल्या. कुसल आणि साईने दुसऱ्या विकेटसाठी 64 रन्सची पार्टनरशीप केली.
त्यानंतर साई आणि वॉशिंग्टन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. ही जोडी मुंबईवर पूर्णपणे वरचढ ठरली. हे दोघे जोपर्यंत मैदानात होते तोवर गुजरातचा विजय निश्चित समजला जात होता. दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यामुळे मुंबईच्या हातातून सामना गेला होता. मात्र मुंबईने हार मानली नाही. मुंबई विकेटच्या शोधात होती. मुंबईच्या विकेटची प्रतिक्षा जसप्रीत बुमराह याने संपवली. बुमराहने अचूक यॉर्कर टाकत वॉशिंग्टनला क्लिन बोल्ड केलं आणि सेट जोडी फोडली. वॉशिंग्टन आणि साईने तिसऱ्या विकेटसाठी 84 रन्सची पार्टनरशीप केली. वॉशिंग्टन 24 बॉलमध्ये 48 रन्स करुन आऊट झाला.
गुजरातचा हिशोब क्लिअर
त्यानंतर मुंबईला मोठी विकेट मिळाली. रिचर्ड ग्लीसन याने साई सुदर्शन याला बोल्ड केलं आणि मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. साईने 49 बॉलमध्ये 80 रन्स केल्या. साईच्या विकेटसह मुंबईने विजयाचा दावा ठोकला. मात्र गुजरातही सामन्यात कायम होती. मात्र मुंबईने ठराविक अंतराने गुजरातला आणखी 2 झटके दिले आणि विजयी धावांपर्यंत पोहचण्यापासून रोखलं. टेंट्र बोल्टने शेरफेन रुदरफोर्ड याला 24 रन्सवर तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. अश्विनी कुमार याने शाहरुख खान याला 13 रन्सवर सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं. तर राहुल तेवतिया 16 रन्सवर नॉट आऊट परतला. मुंबईने यासह क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश निश्चित केला आणि गुजरातच्या 2 पराभवाचा हिशोब चुकता केला. गुजरातने मुंबईला या हंगामातील साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं.
मुंबईची क्वालिफायर 2 मध्ये धडक
𝘾𝙤𝙢𝙚𝙩𝙝 𝙩𝙝𝙚 𝙝𝙤𝙪𝙧, 𝙘𝙤𝙢𝙚𝙩𝙝 𝙩𝙝𝙚 𝙃𝙞𝙩𝙢𝙖𝙣 ✨
Rohit Sharma’s composed 81(50) wins him the Player of the Match award 👏
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/PILBfEJNlA
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
मुंबईकडून ट्रेंट बोल्ट याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिचेल सँटनर आणि अश्वनी कुमार या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. आता मुंबईचा 1 जून रोजी क्वालिफायर 2 मध्ये पंजाब विरुद्ध सामना होणार आहे. मुंबई-पंजाब यांच्यातील विजेता संघ अंतिम फेरीत आरसीबी विरुद्ध भिडणार आहे.
