GT vs CSK Toss : चेन्नईच्या बाजूने शेवटच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल, जीटी विरुद्ध कॅप्टन धोनीचा निर्णय काय?
Gujarat Titans vs Chennai Super Kings Toss : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानात टॉस गमावला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात बॅटिंग करणार आहे. गुजरातसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.त्याआधी 3 वाजता टॉस झाला. कर्णधार म्हणून शेवटच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी याने टॉस जिंकला. सीएसकेने गुजरात विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
चेन्नईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये दीपक हुड्डा याचं कमबॅक झालं आहे. दीपक हुड्डामुळे आर अश्विन याला बाहेर बसावं लागलं आहे. तर गुजरात टायटन्समध्ये कगिसो रबाडा याच्या जागी गेराल्ड कोएत्झी याला संधा देण्यात आली आहे.
गुजरातसाठी महत्त्वाचा सामना
चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान केव्हाच संपुष्ठात आलं आहे. त्यामुळे चेन्नईचा हा सामना जिंकून विजयाने 18 व्या मोसमाला अलविदा करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र गुजरातसाठी टॉप 2 च्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. गुजरातने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. मात्र टॉप 4 मधील संघांमध्ये अजूनही टॉप 2 साठी जोरदार चुरस आहे. गुजरातला टॉप 2 मध्ये कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. त्यामुळे गुजरातसमोर हा सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नई हा सामना जिंकून गुजरातचा गेम बिघडवणार का? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
नंबर 1 विरुद्ध नंबर 10
ताज्या आकडेवारीनुसार, गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. गुजरातने आतापर्यंत 13 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तर गुजरातला 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईसाठी 18 वा हंगाम अतिशय निराशाजनक राहिला. चेन्नईला या हंगामात त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नईला 13 पैकी फक्त 3 सामेनच जिंकता आले आहेत. तर तब्बल 10 वेळा पराभूत व्हावं लागलंय. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन: शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, गेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, अर्शद खान आणि प्रसिद्ध कृष्णा.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन: आयुष म्हात्रे, डेवोन कॉनव्हे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे, दीपक हुड्डा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर आणि कर्णधार), नूर अहमद, अंशुल कंबोज आणि खलील अहमद.
