
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 18 व्या मोसमातील नवव्या सामन्यात विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. गुजरातसाठी टॉप 3 फलंदाजांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मात्र त्यानंतर फलंदाजांना काही खास करता आलं नाही. त्यामुळे गुजरातला 200 पार पोहचण्याची संधी असूनही पोहचता आलं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी गुजरातला झटपट झटके देत मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची भूमिका बजावली. त्यानंतर आता सर्व जबाबदारी ही फलंदाजांवर आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक धावा केल्या. साईने 41 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 63 रन्स केल्या. जोस बटलर याने 24 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. बटलरच्या या खेळीत 1 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. कॅप्टन शुबमन गिल याने 27 चेंडूत 4 चौकार 1 षटकारासह 38 रन्स केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकालाही मुंबईच्या गोलंदाजांनी मोठी खेळी करु दिली नाही.
शेरफान रुदरफोर्ड याने 18 धावा केल्या. शाहरुख खानने 9 रन्स केल्या. राशिद खान याने 6 धावा जोडल्या. कगिसो रबाडाने नाबाद 7 धावा केल्या. तर साई किशोर 1 धाव करुन रनआऊट झाला. मुंबईसाठी कॅप्टन हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, दीपक चाहर, मुजीब उर रहमान आणि एस राजू या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पलटणसमोर 197 धावांचं आव्हान
Innings Break! #MI make a comeback with the ball, but #GT finish with 1⃣9⃣6⃣ on the board! 👌
Who will end up with 2⃣ points tonight? 🤔
Scorecard ▶ https://t.co/lDF4SwnuVR #TATAIPL | #GTvMI | @gujarat_titans | @mipaltan pic.twitter.com/o5xdBI0AlE
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू.