AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digvesh Rathi : अभिषेक शर्मा-दिग्वेश राठी भर मैदानात भिडले, पंचांकडून मध्यस्थी, पाहा व्हीडिओ

Digvesh Rathi and Abhishek Sharma Heated Kalesh Video : लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी या दोघांमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. या राड्याचा व्हीडिओ आता समाजमाध्यामांवर व्हायरल झाला आहे.

Digvesh Rathi : अभिषेक शर्मा-दिग्वेश राठी भर मैदानात भिडले, पंचांकडून मध्यस्थी, पाहा व्हीडिओ
Digvesh Rathi and Abhishek Sharma Heated KaleshImage Credit source: Social Media
| Updated on: May 19, 2025 | 11:17 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या 61 व्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. लखनौचा बॉलर दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा या दोघांमध्ये सामन्यादरम्यान चांगलाच राडा झाला. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र वेळीच पंचांनी आणि लखनौच्या सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढचा वाद टळला. मात्र आता या वादाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र या दोघांमध्ये नक्की कशावरुन बिनसलं? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र दिग्वेश राठी याच्या ट्रेडमार्क सेलिब्रेशनमुळे अभिषेक भडकला असल्याचं म्हटलं जात आहे.

मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं. त्यानंतर हैदराबादकडून अथर्व तायडे आणि अभिषेक शर्मा सलामी जोडी मैदानात आली. मात्र लखनौने दुसऱ्याच ओव्हरमध्ये हैदराबादला 17 धावांवर पहिला झटका दिला. अथर्व 13 धावा करुन बाद झाल्यानंतर ईशान किशन मैदानात आला.

त्यानंतर अभिषेकने ईशानसह मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि अवघ्या 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. अभिषेकच्या या टॉप गिअरमधील फटेकबाजीमुळे हैदराबाद हा सामना झटपट जिंकेल, असं वाटत होतं. मात्र आठव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर दिग्वेश राठी याने अभिषेक शर्मा याला आऊट केलं आणि या सुसाट खेळीला ब्रेक लावला. राठीने अभिषेकला शार्दूल ठाकुर याच्या हाती कॅच आऊट केलं.

अभिषेक आऊट होताच दिग्वेशने ट्रेडमार्क स्टाईलने नोटबूक सेलीब्रेशन केलं. बहुतेक अभिषेकला दिग्वेशची हीच कृती खटकली असावी. त्यानंतर दिग्वेश आणि अभिषेक आमनेसामने आले. या दोघांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. मात्र खेळाडूंनी आणि पंचांनी यशस्वी मध्यस्थी केली. दरम्यान अभिषेकने 20 बॉलमध्ये 295.00 च्या स्ट्राईक रेटने 6 सिक्स आणि 4 फोरसह 59 रन्स केल्या.

अभिषेक शर्मा-दिग्वेश राठी यांच्यात राडा

अभिषेक शर्माची कामगिरी

दरम्यान अभिषेकने या 18 व्या मोसमातील 12 सामन्यांमध्ये 192.27 च्या स्ट्राईक रेटने 33.91 सरासरीने एकूण 373 धावा केल्या. अभिषेक शर्मा याने  या मोसमात 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली. अभिषेकची 141 ही त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.