AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मला 4 दिवस….”, अभिषेक शर्माने विक्रमी खेळीनंतर सूर्यकुमारचं नाव घेत काय म्हटलं?

Abhishek Sharma On Suryakumar Yadav : अभिषेक शर्मा याने पंजाब किंग्सविरुद्ध राक्षसी खेळी करत सनरायजर्स हैदराबादला घरच्या मैदानात विजय केलं. अभिषेकने या खेळीनंतर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव याचं नाव घेतलं.

मला 4 दिवस...., अभिषेक शर्माने विक्रमी खेळीनंतर सूर्यकुमारचं नाव घेत काय म्हटलं?
Abhishek Sharma On Suryakumar Yadav Ipl 2025Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 13, 2025 | 11:39 AM
Share

सनरायजर्स हैदराबादचा ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने शनिवारी 12 एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध 141 धावांची ऐतिहासिक खेळी केली. अभिषेक यासह आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा पहिला भारतीय फंलदाज ठरला. अभिषेकने केलेल्या या खेळीमुळे हैदराबादने 246 धावांचं आव्हान हे सहज आणि 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. हैदराबादचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला. अभिषेकला त्याने केलेल्या शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. माझ्या आजूबाजूला सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंहसारखे काही माणसं आहेत, यासाठी स्वत:ला भाग्यवान समजतो, असं अभिषेकने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हटलं.

आम्ही गेल्या काही सामन्यांत बॅटिंगने योगदान देऊ शकलो नाहीत. मात्र त्यानंतरही टीममधील वातावरण सामान्य होतं. अभिषेकने याचं श्रेय कर्णधार पॅट कमिन्स याला दिलं. सलग 4 सामने गमावणं फार वाईट होतं. मात्र आमच्या टीममध्ये याबाबत चर्चा झाली नाही, असं अभिषेक शर्मा याने म्हटलं.

अभिषेक काय म्हणाला?

“तुम्ही मला फार जवळून पाहिलं तर मी विकेटला लागून (स्टंप) खेळत नाहीत. मात्र मला काही शॉट्सचा अविष्कार करायचा होता, जे या पीचवर फार सोपं होतं. यामुळे आम्हा दोघांना फार मदत मिळाली”, असं अभिषेकने स्पष्ट केलं.

“”मी 4 दिवसांपासून आजारी होतो. मला ताप होता. मात्र मी आभारी आहे की माझ्या आसपास युवराज सिंह आणि सूर्यकुमार यादव यासारखी माणसं आहेत. ते दोघे मला कॉल करत होते. कारण त्यांना माहित होतं की मी असं काही करु शकतो”, असं अभिषेकने म्हटलं.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.