SRH vs PBKS : अभिषेक शर्मा आधीच आऊट झाला, मात्र अंपायरच्या एका निर्णयाने सामना फिरला, व्हीडिओ
Abhishek Sharma : अभिषेक शर्मा पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला. अभिषेकने शतकी खेळी साकारली. मात्र अभिषेक या सामन्यात फार आधीच आऊट झाला होता.

सनरायर्स हैदराबादने सलग 4 पराभवानंतर पंजाब किंग्सविरुद्ध दणक्यात कमबॅक केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला. हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील दुसर्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आणि या 18 व्या मोसमातील दुसरा विजय मिळवला. पंजाबने हैदराबादसमोर विजयासाठी 246 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे हैदराबाद हे आव्हान सहज पूर्ण करेल, असं कुणीच विचार केला नव्हता. मात्र तसं झालं. अभिषेक शर्मा याने केलेल्या शतकी खेळीमुळे सामना एकतर्फी झाला. मात्र पंजाबला अभिषेकची विकेट मिळाली होती. मात्र अंपायरच्या एकान निर्णयामुळे सामना फिरला.
अभिषेक शर्माला जीवनदान
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने स्फोटक शतकी खेळी केली. मात्र इमपॅक्ट प्लेअर म्हणून बॉलिंग टाकायला आलेल्या यश ठाकुर याच्या एका चुकीमुळे अभिषेकला जीवनदान मिळालं. अभिषेक शर्माने 40 चेंडूत त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं.
हैदराबादकडून अभिषेक आणि ट्रेव्हिस हेड या सलामी जडीने हैदराबादला कडक सुरुवात मिळवून दिली. दोन्ही फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. यश ठाकुर हैदराबादच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला. अभिषेकने यशने टाकलेल्या पहिल्या 3 बॉलवर 1 फोर आणि 1 सिक्स ठोकला. यशने त्यानंतर लेंथ बॉल टाकला. अभिषेकने मोठा फटका मारला. मात्र शशांक सिंहने कॅच घेतली. निर्णायक क्षणी विकेट मिळाल्याने पंजाबचे खेळाडू जल्लोष करु लागले. मात्र इथे ट्विस्ट आला. मात्र अंपायरने एक हात बाहेर काढत नो बॉल असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे अभिषेकला जीवनदान मिळालं.
सामन्याचा टर्निंग पॉइंट
4, 6, CAUGHT but NO-BALL, 6 on Free-hit! 🔥
Stop watch you’re doing because it’s all happening in Hyderabad 🥶
Watch the LIVE action ➡ https://t.co/HQTYFKNoGR #IPLonJioStar 👉 #SRHvPBKS | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/vAEZNA65wD
— Star Sports (@StarSportsIndia) April 12, 2025
त्यानंतर अभिषेकने फ्री हीटवर खणखणीत षटकार लगावला. अभिषेकने 246 धावांचा पाठलाग करताना हेडसोबत 12.1 ओव्हरमध्ये 171 रन्सची रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप केली. हेडने 37 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्ससह 66 रन्स केल्या.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.
