IPL 2025 MI vs SRH Live Streaming: मुंबई विरुद्ध हैदराबाबाद आमनेसामने, कोण जिंकणार?
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Streaming: मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये पलटण सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 2 हात करणार आहे. या सामन्याबाबत सर्वकाही एका क्लिकवर जाणून घ्या.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 33 वा सामना हा गुरुवारी 17 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबईचं तर पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. मुंबई आणि हैदराबाद दोन्ही संघांची या मोसमात सारखीच स्थिती आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील प्रत्येकी 7 वा सामना असणार आहे. मुंबई आणि हैदराबादने प्रत्येकी 2-2 सामनेच जिंकले आहेत. सातत्याने सामने गमावल्यानंतर दोन्ही संघांनी आपल्या गेल्या सामन्यात विजय मिळवून कमबॅक केलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयी रथ कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र कुणा एकाचा पराभव होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या सामन्यात या संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामना केव्हा?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामना गुरुवारी 17 एप्रिलला होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हैदराबाद सामना मोबाईलवर जिओस्टार एपवर पाहायला मिळेल.
पॉइंट्स टेबलची स्थिती
दरम्यान दोन्ही संघांची स्थिती सारखी असूनही मुंबई हैदराबादच्या तुलनेत पॉइंट्स टेबलमध्ये वर आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईचा नेट रनरेट. मुंबई एकूण 2 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. मुंबईचा नेट रनरेट हा +0.104 असा आहे. तर हैदराबादचा नेट रनरेट हा -1.245 असा आहे.
