AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 मुंबईकर कर्णधार भिडणार, पंजाब विरुद्ध कोलकाता यांच्यात लढत, चौथ्या विजयासाठी काँटे की टक्कर, कोण जिंकणार?

Punjab Kings vs Kolkata Knight Riders : फर्स्ट क्लासमध्ये क्रिकेटमध्ये एकत्र खेळणारे 2 सहकारी हे पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यानिमित्ताने एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या कर्णधारांमध्ये आपल्या संघाला विजयी करण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

2 मुंबईकर कर्णधार भिडणार, पंजाब विरुद्ध कोलकाता यांच्यात लढत, चौथ्या विजयासाठी काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
| Updated on: Apr 14, 2025 | 6:32 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात मंगळवारी पंजाब किंग्स विरुद्ध गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना मंगळवारी 15 एप्रिलला महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे होणार आहे. या सामन्यानिमित्ताने मुंबईसाठी एकत्र फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणारे 2 सहकारी खेळाडू आमनेसामने येणार आहेत. अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यरकडे पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून कोण यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.  या सामन्यातील जय पराजयावर गुणतालिकेतील चित्र बदलणार हे निश्चित आहे. कारण दोन्ही संघ सध्या टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. विजयी संघाला नक्कीच फायदा होणार आहे.

दोन्ही संघांची कामगिरी

केकेआरने पंजाबच्या तुलनेत या मोसमात 1 सामना जास्त खेळला आहे. पंजाब किंग्सचा हा सहावा तर कोलकाताचा हा सातवा सामना असणार आहे. मात्र दोन्ही संघांनी समसमान सामने जिंकले आहेत. पंजाब आणि केकेआरने प्रत्येकी 3 सामन्यात यश मिळवलं आहे. पंजाबला 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर केकेआरने 3 सामने गमावले आहेत. केकेआरच्या तुलनेत पंजाबने 1 सामना कमी गमावला आहे. मात्र त्यानंतरही केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे. त्याचं कारण म्हणजे नेट रनरेट.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

ताज्या आकडेवारीनुसार, केकेआरने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. केकेआरचा नेट रनरेट हा +0.803 असा आहे. कोलकाता पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर पंजाबने 5 पैकी 3 सामने जिंकलेत तर 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे पंजाबचा नेट रनरेट हा +0.065 असा आहे.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत उभयसंघात एकूण 33 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआरने या पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. केकेआरने 33 पैकी 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबने 12 वेळा पलटवार करत केकेआरला धोबीपछाड दिला आहे. तसेच दोन्ही संघात आतापर्यंत मुल्लानपूरमध्ये एकदाही सामना खेळवण्यात आलेला नाही. तसेच उभयसंघात गेल्या 5 सामन्यांपैकी पंजाबने 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर केकेआरला 2 वेळाच जिंकण्यात यश आलं आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.