PBKS vs MI Toss : निर्णायक सामन्यात पंजाबच्या बाजूने टॉसचा कॉल, पलटणची बॅटिंग, किती धावा करणार?
Punjab Kings vs Mumbai Indians Toss : पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 69 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हार्दिक पंड्या या सामन्यात मुंबईचं नेतृत्व करत आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा आहे. या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. श्रेयस अय्यर याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांसाठी क्वालिफार 1 च्या हिशोबाने हा सामना निर्णायक आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 1 मध्ये पोहचेल. अर्थात या संघाला अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळेल. त्यामुळे सामन्याला जास्त महत्त्व आहे. अशात पंजाबने निर्णायक सामन्यात टॉस जिंकला. मात्र श्रेयसने बॅटिंगचा निर्णय न घेतल्याने काही आजी-माजी भारतीय खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं. आता श्रेयसचा हा निर्णय किती योग्य ठरतो? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल. पंजाबने या हंगामात बहुतांश सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चाहत्यांकडून श्रेयसच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलवं.
मुंबईकडून 1 बदल
मुंबईने पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. अश्वनी कुमार याला संधी दिली आहे. तर पंजाबने मुंबई विरूद्धच्या सामन्यात कायले जेमीन्सन आणि विजयकुमार वैशाख यांना संधी देण्यात आली आहे.
जयपूरमधील आकडेवारी
सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेला हा 18 व्या मोसमातील सातवा सामना आहे. याआधीच्या 6 सामन्यांत पहिले बॅटिंग करणारी टीम 3 वेळा जिंकली आहे. तर दुसर्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाचाही 3 वेळा विजय झाला आहे. तसेच या स्टेडियममध्ये 201 रन्स एव्हरेज स्कोअर आहे. त्यामुळे मुंबई किती धावा करते? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पंजाबने टॉस जिंकला, मुंबईची बॅटिंग
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss & opted to bowl first against @mipaltan.
Updates ▶ https://t.co/Dsw52HOtga#TATAIPL | #PBKSvMI pic.twitter.com/Pbmm2rkM9w
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाक आणि अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
