AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : खरंच नटीनं मारली मिठी? वैभव सूर्यवंशी-प्रीती झिंटाच्या फोटोमागील सत्य काय?

Vaibhav Suryavanshi and Preity Zinta Photo : सोशल मीडियावर कोणताही फोटो आणि व्हीडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असाच एक वैभव सूर्यवंशी आणि प्रीती झिंटा या दोघांचा फोटो व्हायरल झालाय. मात्र या फोटोवरुन प्रीती झिंटाने संताप व्यक्त केला आहे. जाणून घ्या .

Fact Check : खरंच नटीनं मारली मिठी? वैभव सूर्यवंशी-प्रीती झिंटाच्या फोटोमागील सत्य काय?
Vaibhav Suryavanshi and Preity Zinta Photo Fact CheckImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 20, 2025 | 7:34 PM

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी याने 18 व्या मोसमात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. वैभवने पदार्पणातील हंगामात वेगवान शतक ठोकलं. वैभव आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. मात्र आता वैभव दुसर्‍याच एका कारणामुळे चर्चेत आला आहे. वैभव आणि पंजाब किंग्स टीमची मालकीण अभिनेत्री प्रिती झिंटा या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोत वैभव आणि प्रीत झिंटा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. मात्र या व्हायरल फोटोमागील सत्य वेगळं आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात 17 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यानंतर प्रीती झिंटा आणि या युवा खेळाडूची भेट झाली. या दरम्यान दोघांनी हस्तांदोलन केलं. मात्र काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणा केला. प्रीती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचा फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर प्रीती झिंटा हीने एक्स या सोशल मीडिया प्लटफॉर्मवरुन पोस्ट करत संताप व्यक्त केला.

नक्की खरं काय?

मुळात प्रीती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी एकमेकांना मिठी मारलीच नव्हती. या दोघांमध्ये सामन्यानंतर चर्चा झाली. या दरम्यान दोघांनी हस्तांदोलन केलं. मात्र नेटकऱ्यांनी या दोघांनी मिठी मारल्याचा फोटो सोशल मीडियावर पसरवला. या फेक फोटो काही जणांना खराही वाटला.नेटकऱ्यांनी सत्यता न पडताळता फोटो व्हायरल केला.

प्रीती झिंटा फेक फोटोवरुन संतापली

“हा एक मॉर्फ केलेला फोटो आहे. मला खूप आश्चर्य वाटतं की आता वृत्तवाहिन्या देखील मॉर्फ केलेल्या प्रतिमा वापरत आहेत आणि त्यांना बातम्या म्हणून दाखवत आहेत!”, असं म्हणत प्रीती झिंटा हीने हा फोटो खोटा असल्याचं स्पष्ट केलं आणि खोट्या बातम्या दाखवणाऱ्या माध्यमांवर संताप व्यक्त केला.

वैभव सूर्यवंशीची कामगिरी

दरम्यान वैभव सूर्यवंशी याने या 18 व्या मोसमातील 6 सामन्यांमध्ये 32.50 च्या सरासरीने आणि 219.10 या स्ट्राईक रेटने 195 धावा केल्या आहेत. वैभवने या 14 सामन्यांमध्ये 14 षटकार आणि 20 चौकार लगावले आहेत. वैभवची 101 ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.