राहुल द्रविडच्या हाती पुन्हा एकदा काम, आयपीएलमध्ये या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रूजू

राहुल द्रविड याने नुकताच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. तेव्हापासून राहुल द्रविड घरीच असल्याचं सांगत होता. पण अखेर त्याला नवं कामं मिळालं आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत त्याच्या खांद्यावर संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी असणार आहे.

राहुल द्रविडच्या हाती पुन्हा एकदा काम, आयपीएलमध्ये या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रूजू
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 3:53 PM

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर राहुल द्रविडच्या हाती पुन्हा एकदा मोठी जबाबदारी पडली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे. राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीसोबत करार केला आहे. ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार त्याने फ्रेचायझीसोबत आपलं कामंही सुरु केलं आहे. मेगा लिलावात खेळाडूंच्या रिटेन्शनबाबतही राहुल द्रविडने चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.राजस्थान रॉयल्स आणि राहुल द्रविड यांचं जुनं नातं आहे. 2012 आमि 2013 मध्ये या संघाचा कर्णधार होता. तसेच 2014 आणि 2015 मध्ये या संघाच्या टीम डायरेक्टर आणि मेंटॉरची भूमिका बजावली आहे. इतकंच काय तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसोबत काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. राहुल द्रविडच्या आधी ही जबाबदारी श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकाराच्या हाती होती. संगकारा 2021 मध्ये डायरेक्टर ऑफ क्रिकेट या पदावर फ्रेंचायझीसोबत रुजू झाला होता. आता तो संघाचा हेड कोच नसला तर राजस्थान रॉयल्स संघासोबत असणार आहे. संगकारा कॅरेबियन प्रीमियर लीग आणि एसए20 लीग स्पर्धेत फ्रेंचायझीचं काम पाहणार आहे.

रिपोर्टनुसार, राहुल द्रविडसोबत राजस्थान रॉयल्सच्या असिस्टंट कोचपदी टीम इंडियाचा माजी बॅटिंग कोच विक्रम राठोड यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. विक्रम राठोड भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतही होता. त्याचबरोबर नॅशनल क्रिकेट अकादमीत राहुल द्रविडच्या कोचिंग स्टाफमध्येही होता. 2019 मध्ये बीसीसीआयने त्याच्याकडे टीम इंडियाच्या बॅटिंग कोचची जबाबदारी दिली. त्याने ही जबाबदारी 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत पार पडली. आता विक्रम राठोड नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएलच्या पहिल्या पर्वात राजस्थान रॉयल्सने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत जेतेपदापासून वंचित आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघ 2022 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. पण जेतेपद काही मिळालं नाही. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. तर मागच्या पर्वात क्वॉलिफायर 2 फेरीत बाहेर पडावं लागलं. आता राहुल द्रविडने सूत्र हाती घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्स जेतेपद मिळवते की नाही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान याची नियुक्ती झाली आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.