AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs KKR : आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराटचा मोठा कारनामा, नोंदवले दोन विक्रम

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने दोन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर एक विक्रम आणि 28 धावा करताच एक विक्रम नोंदवला. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

RCB vs KKR : आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराटचा मोठा कारनामा, नोंदवले दोन विक्रम
Image Credit source: RCB Twitter
| Updated on: Mar 22, 2025 | 10:09 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने साजेशी कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही. आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदार याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करताना आरसीबीने कोलकात्याचे 8 गडी बाद करत 174 धावांवर रोखलं. खरं तर हे आव्हान सोपं असल्याने सहज गाठेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी रनमशिन्स विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये कोलकात्याच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्ती यालाही सोडलं नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा विराट कोहलीने एक विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहलीचा टी20 क्रिकेट कारकिर्दितील हा 400वा सामना आहे. अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. टी20 फॉर्मेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा मान रोहित शर्माकडे आहे. त्याने 448 सामने खेळले आहेत. त्यानंतर दिनेश कार्तिकचा नंबर लागतो. त्याने 412 सामने खेळले आहेत.

दुसरीकडे, विजयासाठी दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने सावध खेळी केली. यासह विराट कोहलीने दुसरा विक्रम नोंदवला. विराट कोहलीने 28 धावा करताच सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप 5 मध्ये सहभागी झाला आहे. कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 8 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करण्याच्या वेशीवर आहे. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज होणार आहे. कोहलीनंतर रोहित शर्मा 11830 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्रिस गेल (14562), अ‍ॅलेक्स हेल्स (13610), शोएब मलिक (13537) आणि किरॉन पोलार्ड (13537) यांनी 13 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आधीच केला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका