AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs SRH : आरसीबीला प्लेऑफच्या तोंडावर झटका, कॅप्टन बदलला, महाराष्ट्राच्या खेळाडूकडे नेतृत्व

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Toss : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आरसीबीने या सामन्यासाठी कॅप्टन बदलला आहे.

RCB vs SRH : आरसीबीला प्लेऑफच्या तोंडावर झटका, कॅप्टन बदलला, महाराष्ट्राच्या खेळाडूकडे नेतृत्व
Rcb IPL 2025Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 23, 2025 | 7:39 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसामातील 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र आरसीबीसाठी हैदराबाद विरुद्धचा सामना हा टॉप 2 च्या हिशोबाने फार महत्त्वाचा आहे. या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र या निर्णायक सामन्याआधी आरसीबीला मोठा झटका लागला आहे. आरसीबीचा नियमित कर्णधार बदलण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजत पाटीदार दुखापतीमुळे या सामन्यात इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळतोय. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भासाठी खेळणारा विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा याला आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. जितेशने टॉस जिंकून हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही टीमकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

आरसीबीने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन एकमेव बदल केला आहे. युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल याच्या जागी मयंक अग्रवाल याला संधी देण्यात आली आहे. तर नियमित कर्णधार रजतपाटीदार इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार असल्याचं जितेशने टॉस दरम्यान सांगितलं. तसेच सनरायजर्स हैदराबादने तब्बल 3 बदल केले आहेत. स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याचं कमबॅक झालं आहे. हेडला कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील सामन्याला मुकावं लागलं होतं त्यानंतर आता हेड परतलाय. तसेच हेड व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि अभिनव मनोहर यांचंही पुनरागमन झालंय.

महाराष्ट्रातील तिसरा खेळाडू कर्णधार

जितेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भासाठी खेळतो. मात्र राज्य पातळीवर पाहिलं तर जितेश अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनंतर महाराष्ट्रातून आयपीएलच्या 18 व्या मोसमात नेतृत्व करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी रहाणेने केकेआरचं तर ऋतुराजने सीएसकेचं नेतृत्व केलं आहे.

जितेश आरसीबीचा नववा कर्णधार

दरम्यान जितेश आरसीबीचं नेतृत्व करणारा नववा कर्णधार ठरला आहे. आरसीबीचं आयपीएलच्या इतिहासात याआधी राहुल द्रविड, अनिल कुंबळे, केविन पीटरसन, डॅनियल व्हीटोरी, विराट कोहली, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसीस आणि रजत पाटीदार यांनी नेतृत्व केलंय.

हैदराबाद आरसीबीला रोखणार?

सनरायजर्स हैदराबादचं या मोसमात पॅकअप झालंय. तर दुसऱ्या बाजूला प्लेऑफमध्ये पोहचलेल्या आरसीबीकडे हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे आरसीबीसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आता हैदराबाद हा सामना जिंकून आरसीबीची डोकेदुखी वाढवणार की जितेश कॅप्टन म्हणून विजयाने सुरुवात करणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.