IPL 2025 : फुकट की विकत? 18 व्या मोसमातले सामने पाहण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार?

IPL 2025 Live And Digital Streaming : क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलच्या 18 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 18 व्या मोसमातील सामने टीव्ही आणि मोबाईलवर पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना पैसे मोजावे लागणार की फुकटात पाहता येणार आहेत? जाणून घ्या.

IPL 2025 : फुकट की विकत? 18 व्या मोसमातले सामने पाहण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार?
Ipl 2025 Live And Digital Streaming
Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 17, 2025 | 9:26 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं (IPL 2025) काउंटडाऊन सुरु झालं आहे. टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग असा लौकीक असणाऱ्या आयपीएल स्पर्धेतील 18 व्या हंगामाला शनिवार 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना हा कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना ऐतिहासिक ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या 18 व्या मोसमासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांना मोबाईल आणि टीव्हीवर सामने पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार की फुकटात पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच वायकॉम 18 आणि स्टार इंडिया यांच्यात मर्जर झालं. दोन्ही ग्रुप एकत्र आले. त्यामुळे आधीच्या डिज्ने प्लस हॉटस्टारचं नामकरण ‘जिओ-हॉटस्टार’ असं करण्यात आलं. जिओ सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक खास प्लान आणण्यात आला आहे. या प्लाननुसार 299 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या प्लानुसार नवं सिम कार्ड घेतल्यास आयपीएलचे सामने मोफत पाहता येतील.

तुमच्याकडे आधीपासूनच जिओ सिम कार्ड असलं तरीही 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतरच 18 व्या मोसमातील सामने मोफत पाहता येतील. या ऑफरनुसार युझर्सला 90 दिवसांसाठी जिओ-हॉटस्टारचं सब्सिक्रिप्शन मिळेल. त्यानंतर टीव्ही आणि मोबाईलवर क्रिकेट चाहत्यांना सामने पाहता येतील.’जिओ-हॉटस्टार’ असं या पॅकचं नाव आहे. तसेच ज्या यूझर्सला दिवसाला 2 जीबी डेटा मिळतो त्यांना अनलिमिटेड 5G डेटा मिळेल.

जिओच्या अनलिमिटेज ऑफरमध्ये काय-काय?

टीव्ही आणि मोबाईलवर 90 दिवसांसाठी मोफत जिओ-हॉटस्टार सब्सक्रिप्शन (4K Quality)
50 दिवसांसाठी मोफत JioFiber/AirFiber घरासाठी ट्रायल कनेक्शन
800 पेक्षा अधिक टीव्ही चॅनेल्स
11 पेक्षा अधिक ओटीटी App

अनलिमिटेड वायफाय ऑफरचा लाभ कसा घ्याल?

अनलिमिटेड वायफाय ऑफरचा लाभ घेण्यासाठी 17 ते 31 मार्च दरम्यान जिओ सिम कार्ड खरेदी करावं लागेल. तसेच जिओ सिम कार्डधारकांना 299 रुपये (1.5 जीबी) किंवा त्यापेक्षा अधिकच्या किंमतीचा रिचार्ज करावा लागेल. हीच बाब नवीन जिओ सिम कार्ड घेतलेल्यांनाही लागू आहे. तसेच ज्यांनी 17 मार्च आधी रिचार्ज केला आहे, त्यांना 100 रुपये खर्च करुन Add On Pack हा पर्याय निवडावा लागेल. जिओ-हॉटस्टार पॅकची वैधता 22 मार्चपासून 90 दिवस असणार आहे.