IPL 2026: मुंबई इंडियन्स आणि केकेआरविरुद्धचा सामना 8 षटकानंतर थांबला, रहाणेच्या संघाची धाकधूक वाढली

आयपीएल 2026 स्पर्धेतील 65वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. हा सामना कोलकात्यासाठी खूपच महत्वाचा आहे. या सामन्यात केकेआरच्या बाजूने लागला पण आठव्या षटकानंतर धडकी भरली.

IPL 2026: मुंबई इंडियन्स आणि केकेआरविरुद्धचा सामना 8 षटकानंतर थांबला, रहाणेच्या संघाची धाकधूक वाढली
IPL 2026: मुंबई इंडियन्स आणि केकेआरविरुद्धचा सामना 8 षटकानंतर थांबला, रहाणेच्या संघाची धाकधूक वाढली
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 20, 2026 | 8:37 PM

आयपीएल 2026 स्पर्धेची लढत आता अंतिम टप्प्यात आली आहे. साखळी फेरीचे मोजून दोन चार सामने शिल्लक आहे. असं असताना प्लेऑफसाठी तीन संघ ठरले आहेत. आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सला तिकीट मिळालं आहे. दुसरीकडे चौथ्या संघासाठी पाच संघांमध्ये चुरस आहे. असं असताना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. हा सामना केकेआरसाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात केकेआरला काहीही विजय मिळवणं भाग आहे. कारण प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकायचे आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच चांगली सुरूवातही केली. केकेआरने 8 षटकात 57 धावांवर मुंबईच्या चार खेळाडूंना तंबूत पाठवलं. त्यामुळे पावरप्लेवर केकेआरने चांगली पकड मिळवली. पण आठवं षटकं संपलं आणि ट्विस्ट आलं.

आयपीएल स्पर्धेतील केकेआरने आठवं षटक पूर्ण केलं आणि पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पाऊस खूपच जोरदार असल्याने मैदान कर्मचारी मैदानावर आच्छादन घालण्यासाठी धावपळ करत होते. पावसाचा वेग पाहून पाऊस जाईल की नाही याची शंका आता केकेआर संघाच्या मनात घर करून आहे. हा सामना रद्द झाला तर केकेआरचं मोठं नुकसान होणार आहे. कारण दोन्ही सामन्यात विजय अपेक्षित आहे. हा सामना रद्द झाला तर एक गुण मिळेल आणि प्लेऑफच्या आशेला सुरूंग लागेल. मग शेवटचा सामना जिंकला तर गणित नेट रनरेटवर सोडवणं कठीण जाईल.

आयपीएल स्पर्धेत केकेआरने आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. साखळी पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे पदरात एक गुण पडला होता. केकेआरचे 11 गुण असून नेट रनरेट -0.038 इतका आहे. जर हा सामना रद्द झाला तर एक गुण मिळेल आणि 12 गुण होतील. पण नेट रनरेटमध्ये काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे शेवटच्या सामन्यात केकेआरची पळता भुई थोडी होईल. कारण राजस्थान रॉयल्सचे 14 गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट हा +0.083 आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सने शेवटचा सामना गमावला तर केकेआरला संधी मिळेल. पण नेट रनरेट हा राजस्थानपेक्षा चांगला असावा लागेल.

Follow Us