AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, MI vs KKR : मुंबई इंडियन्स आणि कोलकात्याचा कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड, जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोणत्या संघाचं पारडं जड आहे? चला जाणून घेऊयात आकडेवारी

IPL 2026, MI vs KKR : मुंबई इंडियन्स आणि कोलकात्याचा कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड, जाणून घ्या
मुंबई इंडियन्स आणि कोलकात्याचा कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड, जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 28, 2026 | 8:41 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आतुर असणार आहे. मागच्या पर्वात दोन्ही संघाची कामगिरी काही खास राहिली नव्हती. मुंबई इंडियन्सने टॉप 4 मध्ये जागा मिळवली. पण अंतिम फेरी काही गाठू शकले नाहीत. तर केकेआरचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता. पण यावेळी दोन्ही संघ पुन्हा एकदा नव्या जोमाने उतरणार आहेत. मुंबई इंडियन्सने पाच वेळा, तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. यावेळी दोन्ही संघ आपल्या विजेतेपदांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. दोन्ही संघांनी आपल्या नेतृत्वात बदल केलेला नाही. केकेआरची धुरा अजिंक्य रहाणे, तर मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्याकडे आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा आहे. कोणता संघ भारी पडला आहे, हे सर्व काही जाणून घेऊयात

दोन्ही संघात हेड टू हेड कामगिरी कशी?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स 35 वेळा भिडले आहेत. यात मुंबईने 24 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स फक्त 11 सामन्यात विजय मिळवू शकली आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसत आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स वानखेडे स्टेडियमवर 12 वेळा आमनेसामने आले होते. यात मुंबई इंडियन्सने 10 वेळा, तर केकेआर फक्त 2 सामन्यात विजयी ठरली आहे.

सर्वाधिक धावांचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर?

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघापैकी कोणत्या संघाने सर्वाधिक धावा केल्या आहेत? असा प्रस् न पडल्याशिवाय राहात नाही. तर त्याचं उत्तर कोलकाता नाईट रायडर्स असं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 232 धावा केल्या आहे. तर कमी धावांवर बाद होण्याचा विक्रमही कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर आहे. कोलकात्याचा संघ फक्त 67 धावांवर बाद झाला होता. तर मुंबईच्या 68 धावा आहेत.

नाणेफेकीचा कौल काय सांगतो?

मुंबई इंडिनयन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स 35 वेळा आमनेसामने आले आहे. यापैकी 20 सामन्यात मुंबईने, 15 सामन्यात कोलकात्याने बाजी मारली. मुंबईने नाणेफेक जिंकताना 14 वेळा सामना जिंकला आहे. तर कोलकात्याने फक्त 5 वेळा नाणेफेक जिंकल्यानंतर विजय मिळवला आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय