AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?

आयपीएल 2026 स्पर्धेतील 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत. खरं तर या सामन्यात हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे. तर पंजाब किंग्सला विजयी रथ पुढे न्यायचा आहे.

IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?
IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 15, 2026 | 6:01 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत पहिल्या टप्प्यातील सामने संपत आले आहेत. त्यामुळे यापुढे टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरशीची लढाई असणार आहे. या स्पर्धेच्या 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ भिडणार आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी जबरदस्त होत आहे. पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 4 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने 1 गुण मिळाला आहे. पंजाबचा संघ 7 गुण आणि +0.720 नेट रनरेटसह दुसर्‍या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सची संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. संघात तगडी स्टार कास्ट असूनही पराभवाची मालिका सुरू आहे. मुंबई इंडियन्सने 4 पैकी 3 सामने गमावले आहेत. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईच्या खात्यात 2 गुण असून -0.722 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा विजयासाठी चांगलाच घाम निघणार असं दिसत आहे.

पंजाब किंग्सविरुद्धचा सामना मुंबईचं होमग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पण या मैदानात आरसीबीने मागच्या सामन्यात मुंबईला धूळ चारली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघावर दडपण असणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स 34 वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 17 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आकडेवारीत काहीच मागे पुढे नाही. पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सची सर्वोच्च धावसंख्या 223 आहे, तर त्यांची सर्वात कमी धावसंख्या 87 आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सने मुंबईविरुद्ध 230 धावांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे, तर सर्वात कमी धावसंख्या 119 आहे.

मागच्या पर्वात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दोन सामने झाले. या दोन्ही सामन्यात पंजाब किंग्सने बाजी मारली. पहिल्या सामन्यात 7 गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेत काय होते याकडे लक्ष लागून आहे. वानखेडेवर या दोन्ही संघात 10 सामने झाले आहेत. यापैकी 5 सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पाच सामन्यात पंजाब किंग्सने बाजी मारली आहे. त्यामुळे दोन्ही संघाची आकडेवारी पाहिली तर तूल्यबल सामना दिसत आहे. पण मुंबई इंडियन्सला स्पर्धेतील पुढच्या प्रवासासाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...