AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेत वारंवार होतेय चूक, पंचांना दंड ठोठावण्याची शिफारस

आयपीएल स्पर्धेत कर्णधार आणि खेळाडूंवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षेची तरतूद आहे. अनेक कर्णधार आणि खेळाडूंना त्याचा फटका बसला आहे. आता आयपीएल स्पर्धेत पंचांवरही दंड ठोठावण्याची शिफारस होत आहे.

आयपीएल स्पर्धेत वारंवार होतेय चूक, पंचांना दंड ठोठावण्याची शिफारस
आयपीएल स्पर्धेत पंचांकडून वारंवार चुकांचा धडाका, दंड ठोकण्याची शिफारसImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 15, 2026 | 5:34 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला टप्पा पार पडला असून आता स्पर्धा मध्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेतील काही घटनांमुळे क्रिकेट नियम तयारी संस्था एमसीसीचा संताप झाला आहे. एमसीसीच्या मते, आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामना गरजेपेक्षा अधिक लांबवला जात आहे. काही सामने तर 4 तास 22 मिनिटांपर्यंत चालले. यावर एसीसीचे हेड ऑफ क्रिकेट फ्रेजर स्टीवर्ट आणि कठोर प्रतिक्रिया नोंदवली आहे. फ्रेजर स्टीवर्ट यांच्या मते, कर्णधार नाही तर पंचांवर दंड ठोठावला पाहिजे. एमसीसी अध्यक्षांनी मुंबई क्रिकेट असोसिएसशनला सांगितलं की, ‘पंचांमुळे सामने संथ गतीने होत आहे. मला वाटतं की सामना वेळेत संपवणं हे पंचांचं काम आहे. पण जेव्हा प्रत्येक ब्रेकवर जाहिरात असते आणि कोट्यवधि लोक पाहात असतात तेव्हा आम्ही समजू शकतो, असं का होत नाही.’

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील सामना तर क्रीडाप्रेमींसाठी कंटाळवाणा ठरला. हा सामना 4 तास 22 मिनिटे चालला. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला होता. आता एमसीसी प्रमुखांनी हा मुद्दा उचलला आहे. एमसीसी प्रमुख म्हणाले की, पुरेसे नियम आहेत आणि पण पंच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सामना संपण्यास उशीर होतो. स्टीवर्ट यांनी सांगितलं की, दुसऱ्या डावातील 6-7 षटकं पाहिले आणि स्टेडियममधून थेट हॉटेलसाठी रवाना झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचलो आणि टीव्ही चालू केला तेव्हा पाच षटकं शिल्लक होती.

पंचांना दंड लावा

फ्रेजर स्टीवर्ट यांनी सल्ला दिला की, सामन्यात उशीर होत असेल तर पंचांवर दंड ठोकला पाहिजे. सध्या फक्त कर्णधारांना त्याची किंमत मोजावी लागत आहे. आतापर्यंत पाच कर्णधारांना संथ गतीने गोलंदाजी केल्याने दंड ठोठावला आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला दोनदा, हार्दिक पांड्या-अजिंक्य रहाणे-शुबमन गिल- ऋतुराज गायकवाड यांना प्रत्येकी एक वेळा दंड ठोठावला आहे. आतापर्यंत पाच कर्णधारांकडून दंडाची रक्कम म्हणून 84 लाख वसूल करण्यात आले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...