PBKS vs MI : तिलक वर्माची फायर खेळी, मुंबईकडून हिशोब चुकता, पंजाबचा सलग पाचवा पराभव

Punjab Kings vs Mumbai Indians Match Result, IPL 2026 : मुंबईने तिलक वर्मा याच्या नाबाद खेळीच्या जोरावर 2 गुणांची कमाई करत गेल्या पराभवाचा अचूक हिशोब केला आहे. तर पंजाब सलग पाचव्यांदा अपयशी ठरली आहे.

PBKS vs MI : तिलक वर्माची फायर खेळी, मुंबईकडून हिशोब चुकता, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Tilak Varma MI vs PBKS IPL 2026
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 14, 2026 | 11:43 PM

तिलक वर्मा याने केलेल्या नाबाद आणि झंझावाती खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026)  58 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. प्रभसिमरन सिंह याचं अर्धशतक आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर पंजाबने धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये मुंबईसमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 1 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. मुंबईने या विजयासह पंजाबचा हिशोब केला. पंजाबने मुंबईला या मोसमात याआधी पराभूत केलं होतं. मात्र मुंबईने या विजयासह पराभवाची अचूक परतफेड केली.  मुंबईने या विजयासह या मोसमातील एकूण चौथा सामना जिंकला. तर पंजाबचा सलग आणि एकूण पाचवा पराभव ठरला आहे. त्यामुळे आता पंजाबचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं आहे.

Follow Us