RCB vs GT Qualifier 1 Toss : गुजरातचा आरसीबी विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, गतविजेत्यांना किती धावांवर रोखणार?
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Qualifier 1 Toss and Playing 11 : गुजरात टायटन्सने टॉस जिंकून गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आरसीबी आता गुजरातसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गुजरात टायटन्सच्या बाजूने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) प्लेऑफ्समधील क्वालिफायर 1 या निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेत चेजिंग करणार असल्याचं म्हटलं आहे. क्वालिफायर 1 सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे आता कोणता संघ फायनलचं तिकीट मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
आरसीबी आणि गुजरात प्लेइंग ईलेव्हन
आरसीबी आणि गुजरात या दोन्ही संघांनी निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. अर्शद खान याच्या जागी कुलवंत खेजरोलिया याचा समावेश करण्यात आला आहे. यासह कुलवंतचा हा या मोसमातील पहिलाच सामना ठरला आहे. तर आरसीबी टीममध्ये जेकब डफी याचं कमबॅक झालं आहे.
आरसीबी-जीटी तिसऱ्यांदा आमनेसामने
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमेनसामने असण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघांचा साखळी फेरीत 2 वेळा आमनासामना झाला होता. गुजरात आणि आरसीबी या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला होता. त्यामुळे आता या एकूण तिसऱ्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघ तुल्यबळ, कोण घेणार आघाडी?
दरम्यान गुजरात विरुद्ध आरसीबी यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. या 8 पैकी 4 सामन्यांत आरसीबीने विजय मिळवला आहे. तर गुजरातनेही तेवढेच सामने जिंकून आरसीबीचा अचूक हिशोब केला आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ सामना जिंकून फायनलचं तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरणार? यासाठी 40 ओव्हरची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
लाईव्ह स्कोअरकार्ड
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कुलवंत खेजरोलिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : वेंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम दार.