IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाबचा विजयरथ रोखला, काय चुकलं कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सचा विजयरथ अखेर राजस्थान रॉयल्सने रोखला. पंजाब किंग्सने विजयासठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 4 गडी गमवून राजस्थान रॉयल्सने पूर्ण केलं. या सामन्यातील पराभवानंतर श्रेयस अय्यरने आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.

IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाबचा विजयरथ रोखला, काय चुकलं कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाबचा विजयीरथ रोखला, काय चुकलं कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 28, 2026 | 11:07 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब अखेर पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. सहा विजय आणि एक सामना रद्द झाल्यानंतर पहिल्या पराभवाला सामोर जावं लागलं. पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि पंजाबला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात पंजाब किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 222 धावा केल्या आणि विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 4 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं. तर पंजाब किंग्सचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न एक विजय लांबलं आहे. या सामन्यातील पराभवानंतर श्रेयस अय्यरने आपलं मत व्यक्त केलं आहे.

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘224 ही एक चांगली धावसंख्या होती. चिकट खेळपट्टीवर ही एक अपवादात्मक कामगिरी होती. आम्ही आमच्या गोलंदाजीत कमी पडलो. हा एक असा फॉरमॅट आहे जिथे अनेक खेळाडूंनी खेळाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. सर्व काही अंमलबजावणीवर अवलंबून असते. आजचा दिवस आमचा नव्हता. आपण ज्या गोष्टी करत आलो आहोत, त्याच गोष्टींना चिकटून राहणे महत्त्वाचे आहे. शरीरही थोडे थकले होते, पण ते कारण असू शकत नाही. या हंगामातील हा आमचा पहिला पराभव आहे, यातून आम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळते. आम्हाला फक्त हे विसरून पुढे जायचे आहे. मागे वळून पाहता, अनेक गोष्टी घडू शकल्या असत्या. फिरकी गोलंदाजांविरुद्ध धावा करणे कठीण होते. हरप्रीत ब्रारला सलाम.’

पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला असता तर प्लेऑफमधील जागा जवळपास पक्की झाली असती. आता पंजाब किंग्सला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आणखी एका विजयाची वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. आता राजस्थान रॉयल्सला दोन विजयाची गरज आहे.

Follow Us