AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲापरेशन सक्सेस, पण वेट ॲंड वॉच, ठाकरेंच्या त्या खेळीचा धसका

Shivsena Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या गटातील 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. असं असलं तरी कायदेशीर आव्हानांमुळे शिवसेना सध्या ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

ॲापरेशन सक्सेस, पण वेट ॲंड वॉच, ठाकरेंच्या त्या खेळीचा धसका
Shinde vs ThackerayImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 17, 2026 | 10:43 PM
Share

राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, 6 खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर ऑपरेशन टायगरची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. मात्र आता हे ऑपरेशन काही काळ रखडले जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कायदेशीर लढाई लढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून वेट अँड वॉचची भूमिका घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत

समोर आलेल्या माहितीनुसार, आज झालेले ऑपरेशन टायगर फुल प्रूफ झालेले असून, त्यात काहीही अडचण नाही. मात्र आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही. कोणतेही पुरावे द्यायचे नाही, अशी वेट अँड वॉचची भूमिका शिवसेनेनी घेतली आहे. कारण यामागे काही तांत्रिक गोष्टी आहेत. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पाऊले टाकली जाणार असल्याचे समोर आले आले आहे. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणले जाणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सुत्रांकडून देण्यात आली आहे.

कायदेशीर बाबी तपासल्या जाणार

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झाले आहेत, मात्र ते माध्यमांशी संवाद साधणार नाहीत. कायदेशीर बाबी लक्षात घेता तूर्तास या सहा खासदारांचा प्रवेश दोन ते तीन दिवस लाबंणीवर पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ठाकरे गटाकडून येणाऱ्या आक्षेपांवर आधी काम केला जाणार आणि नंतर टेक्निकल आणि कायदेशीर बाजू तपासून शिवसेना या सहा खासदारांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ठाकरेंची साथ सोडणाऱ्या 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतून बाहेर हलवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

ठाकरेंचे कोणते खासदार फुटले?

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील, वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी