AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs MI : मुंबई आरसीबीचा हिशोब करण्यासाठी सज्ज, पराभवाची परतफेड करणार?

Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Preview : आरसीबीचा मुंबईला सलग दुसऱ्यांदा पराभूत करुन प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न असणार आहे. तर मुंबई गेल्या पराभवाची वसुली करण्यासाठी उत्सूक आहे.

RCB vs MI : मुंबई आरसीबीचा हिशोब करण्यासाठी सज्ज, पराभवाची परतफेड करणार?
MI vs RCB Ipl 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 10, 2026 | 5:15 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) रविवारी 10 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. तर डबल हेडरमधील दुसरा सामना हा हायव्होल्टेज असणार आहे. या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण 11 वा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. मुंबई इंडियन्सला या सामन्यात गेल्या पराभवाची परतफेड करुन प्लेऑफमधील आपलं जरतरचं आव्हान कायम ठेवण्याची दुहेरी संधी आहे. त्यामुळे पलटण या प्रयत्नात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पलटण गतविजेत्या बंगळुरुचा हिशोब करणार का?

आरसीबीने मुंबईला 12 एप्रिलला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये 18 धावांनी पराभूत केलं होतं. आरसीबी ‘टीमने मुंबईसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने जोरदार झुंज दिली होती. मात्र मुंबईला 222 धावांपर्यंतच पोहचता आलं होतं. त्यामुळे हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीत पलटण कशी कामगिरी करते याची उत्सूकता चाहत्यांना लागून आहे.

दोन्ही संघांची  19 व्या मोसमातील कामगिरी

आरसीबीने या हंगामात 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीला 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. तसेच आरसीबीचा गेल्या 2 सामन्यांत पराभव झालाय. त्यामुळे आरसीबीसमोर कमबॅक करण्यासह पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. आरसीबी 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी विराजमान आहे.

मुंबईची निराशाजनक कामगिरी

मुंबईने 19 व्या मोसमात आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी केली आहे. मुंबईला 10 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. तर पलटणचा 7 सामन्यांत पराभव झाला आहे. पलटणच्या खात्यात 6 गुण आहेत. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.

सामना कुठे आणि किती वाजता?

दरम्यान आरसीबी विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच स्मार्ट टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल. तसेच https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकद्वारे सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...