AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबाद की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू! विराट कोहली वचपा काढणार?

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. हा सामना अतितटीचा होणार यात काही शंका नाही. कारण तशी आकडेवारीच आहे. चला जाणून घेऊयात कोण बाजी मारेल ते

IPL 2026, RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबाद की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू! विराट कोहली वचपा काढणार?
IPL 2026, RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबाद की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू! विराट कोहली वचपा काढणार?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 27, 2026 | 5:36 PM
Share

IPL 2026, RCB vs SRH: आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. दोन्ही संघातील खेळाडू पाहिले तर हा सामना रोमांचक होईल असं दिसत आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होत आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं हे होमग्राउंड आहे. पण असं असलं तरी सनरायझर्स हैदराबादचं पारडं तुलनेनं अधिक वजन आहे. कारण जोश हेझलवूडची उणीव आरसीबी संघाला प्रकर्षाने जाणवणार आहे. तर यश दयाल खेळत नाही. मागच्या आयपीएल स्पर्धेतही सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला 42 धावांनी पराभूत केलं होतं. मागच्या पर्वात हा एकमेव सामना झाला होता. यात इशान किशनने तोडफोड केली होती. त्याने 5 षटकारांच्या जोरावर 94 धावांची खेळी केली होती. तर अभिषेक शर्माने 17 चेंडूत 34 धावा केल्या होत्या. हैदराबादने 20 षटकात 231 धावा केल्या आणि आरसीबीला 189 धावांवर रोखलं. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा हैदराबाद काढणार का?

कोणाचं पारडं जड?

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा संघ आरसीबीपेक्षा भारी ठरला आहे. आतापर्यत या दोन्ही संघात 25 सामने खेळले गेले आहेत. त्यात सनरायझर्स हैदराबादने 14, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 11 सामने जिंकले आहेत. यंदा आरसीबी आणि सनरायझर्स हैदाबात यांच्यात दोन सामने होणार आहे. 28 मार्च आणि 22 मे रोजी हे दोन्ही संघ भिडणार आहेत. आता पहिल्या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. इशान किशन सनरायझर्स हैदाराबादची धुरा सोपवण्यात आली आहे. पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याकडे नेतृत्व आहे. त्यात इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याची झलक टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दिसली.

विराट कोहलीचा हैदराबादविरुद्ध रेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 24 सामन्यात 805 धावा केल्या आहेत. तर या दोन्ही संघांमध्ये सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम जॉनी बेयरस्टोच्या नावावर आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना 56 चेंडूत 114 धावा केल्या आहे. तर सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना डेविड वॉर्नरने सर्वाधिक 33 षटकार मारले आहे. इतकंच काय तर हैदराबादविरुद्ध आरसीबीने एकदा नांगी टाकली आहे. फक्त 68 धावांवर संपूर्ण संघ तंबूत गेला होता.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा