AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 CSK Captain : संजू, धोनी की ऋतुराज? सीएसकेचा कॅप्टन कोण? मॅनेजमेंटचा मोठा निर्णय

Chennai Super kings Captain Name : चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन कोण? फ्रँचायजीकडून नेतृत्वाची माळ कुणाच्या गळ्यात? जाणून घ्या 19 व्या मोसमात सीएसकेचं नेतृत्व कोण करणार?

IPL 2026 CSK Captain : संजू, धोनी की ऋतुराज? सीएसकेचा कॅप्टन कोण? मॅनेजमेंटचा मोठा निर्णय
Sanju Samson MS Dhoni and Ruturaj GaikwadImage Credit source: @ChennaiIPL and Pti
| Updated on: Nov 15, 2025 | 7:22 PM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी (IPL 2026) एकूण 10 फ्रँचायजींनी करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. रिटेन्शनआधीच काही संघांनी संमतीने खेळाडूंना ट्रेड केलं होतं. तर त्यानंतर रिटेन्शनमधून फ्रँचायजींनी काही खेळाडूंना नारळ दिला आहे. रवींद्र जडेजा-संजू सॅमसन यांची अदलाबदल ही आगामी मोसमासाठीची सर्वात मोठी डील ठरली. राजस्थान रॉयल्सने ऑलराउंडर रवींद्र जडेजा या आपल्या जुन्या भिडूला आपल्या गोटात घेतलं. तर राजस्थानसाठी दशकापेक्षा जास्त काळ खेळणाऱ्या संजू सॅमसनची ट्रेडद्वारे चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री झाली आहे.

संजू सॅमसनची सीएसकेमध्ये एन्ट्री झाल्याने आता या टीमचा कॅप्टन कोण असणार? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता. चेन्नईने संजूल घेतल्याने त्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली जाणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र आता फ्रँचायजीच्या घोषणेमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. फ्रँचायजीने रिटेन्शननंतर कर्णधाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाड हाच नेतृत्व करणार असल्याचं सीएसेकेने जाहीर केलं आहे. सीएसकेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत ही घोषणा केली आहे.

संजू सॅमसन याला नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. संजूने राजस्थानचं 2021 ते 2024 या दरम्यान नेतृत्व केलं होतं. संजू्ने त्याच्या नेतृत्वात राजस्थानला 2022 साली अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं होतं. मात्र राजस्थानला तेव्हा उपविजेतपदावर समाधान मानावं लागलं होतं.

ऋतुराज कर्णधारपदी कायम

ऋतुराजला आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. ऋतुराजला या दुखापीतमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर ऋतुराजच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंह धोनी याने उर्वरित हंगामात नेतृत्व केलं होतं.

ऋतुराजची कर्णधार म्हणून आकडेवारी

ऋतुराज गायकवाड याने चेन्नई सुपर किंग्सचं आतापर्यंत एकूण 19 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. ऋतुराजने आपल्या नेतृत्वात 19 पैकी 8 सामन्यांमध्ये चेन्नईला विजयी केलं आहे. तर चेन्नईला 11 वेळा पराभूत केलं आहे. ऋतुराजला दुखापतीमुळे 2025 साली संपूर्ण मोसमात खेळता आलं नाही. त्यामुळे ऋतुराजचा यंदा चेन्नईला आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे.

ऋतुराजचं यलो आर्मीचा कॅप्टन

चेन्नईची निराशाजनक कामगिरी

चेन्नई आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. चेन्नईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र चेन्नई गेल्या हंगामात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली. चेन्नईला गतमोसमात 14 पैकी तब्बल 10 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तर चेन्नईला फक्त 4 सामनेच जिंकता आले.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.