RR vs MI : मुंबईने 66 चेंडूंच्या सामन्यात टॉस जिंकला, बुमराह राजस्थान विरुद्ध किती ओव्हर टाकणार?
Rajasthan Royals vs Mumbai Indians Toss : पावसाने घातलेल्या खोड्यानंतर अखेर सामना होणार असल्याने राजस्थान आणि मुंबईच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसामुळे 9 ओव्हरचा खेळ वाया गेला आहे. उभयसंघात 66 चेंडूंचा सामना होणार आहे.

गुवाहाटीतून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 वा सामना होणार असल्याचं अखेर निश्चित झालं आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात तर 7 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे टॉस आणि सामना सुरु होण्यास विलंब झाला आहे. पावसाने तब्बल 160 मिनिटांचा वेळ वाया घालवला. मात्र ग्राउंड स्टाफच्या कठोर मेहनतीमुळे अखेर सामना होणार आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजून 55 मिनिटांनी टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याचं कमबॅक झालं आहे. पंड्याने राजस्थान विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
पावसामुळे 9 ओव्हरचा गेम, 11 षटकांचा खेळ होणार
पावसाने अडीच तासांपेक्षा वेळ वाया घालवला. त्यामुळे 9 ओव्हरचा खेळ वाया गेला आहे. राजस्थान विरुद्ध मुंबई यांच्यात 20 ओव्हरचा सामना होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आता 20 ऐवजी 11 षटकांचा खेळ होणार आहे.
पावरप्ले किती ओव्हरचा?
साधारणपणे पावरप्ले 6 ओव्हरचा असतो. मात्र पावसामुळे 11 ओव्हरच्या या सामन्यात पहिले 20 बॉल पावरप्ले (3.2 ओव्हर) असणार आहे. तसेच 2 गोलंदाजांना प्रत्येकी 2 ओव्हर टाकता येणार आहेत. तर एकमेव गोलंदाज 3 ओव्हर टाकेल. जसप्रीत बुमराह मुंबईचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे बुमराह 3 ओव्हर टाकणारा एकमेव गोलंदाज असू शकतो.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये किती बदल?
दरम्यान राजस्थान रॉयल्सने 19 व्या मोसमातील सलग 2 विजयानंतर मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला मुंबईने 2 बदल केले आहेत. नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याचं कमबॅक झालं आहे. हार्दिकला दिल्ली विरूद्धच्या सामन्यात अस्वस्थ वाटत असल्याने मुकावं लागलेलं. त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्याने नेतृत्व केलं होतं. तर हार्दिकच्या जागी दीपक चाहर याला संधी देण्यात आली होती. मात्र हार्दिकच्या कमबॅकनंतरही दीपकला प्लेइंग ईलेव्हनध्ये कायम ठेवण्यात आलं आहे. तर कॉर्बिन बॉश याचा इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, अल्लाह गझनफर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.