AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?

Rajasthan Royals vs Mumbai Indians Toss Delyed : गुवाहाटातील बारसपारा क्रिकेट स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात पाऊस झालाय. पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे.

RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?
Rajasthan Royals vs Mumbai Indians RainImage Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 07, 2026 | 8:36 PM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 6 एप्रिलला झालेल्या सामन्यात 3.5 ओव्हरचा खेळ झाला. केकेआरने 22 बॉलमध्ये 2 विकेट्स गमावून 25 धावा केल्या. मात्र त्यानंतर आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे सव्वा 3 तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतरही चाहत्यांना सामना सुरु होईल अशी आशा होती. मात्र अखेर खेळपट्टीची परिस्थिती पाहून पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या सहमतीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सलग दुसरा सामनाही पावसामुळे रद्द होतो की काय? अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

स्पर्धेतील 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. चाहत्यांचं सामन्याआधी टॉस कोण जिंकतो? याकडे लक्ष होतं. मात्र पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होतो. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे टॉसला विलंब झाला आहे. पावसामुळे30 मिनिटं वाया गेली आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना पावसाच्या विश्रांतीची वाट पाहावी लागणार आहे.

ग्राउंड स्टाफकडून जोरदार प्रयत्न

बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु असलेल्या पावसामुळे मैदानात पाणी जमा झालं आहे. त्यामुळे हे पाणी लवकरात लवकर हटवण्याचं आव्हान ग्राउंड स्टाफसमोर आहे. ग्राउंड स्टाफकडून युद्ध पातळीवर मैदान कोरडं करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पावसाची संततधार सुरु असल्याने ग्राउंड स्टाफच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे पाऊस थांबावा अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

गुवाहाटीत पावसाची बॅटिंग

क्रिकेट चाहत्यांचा संताप

पावसाच्या व्यत्ययामुळे क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नको तिथे सामने ठेवल्यावर आणखी काय होणार? असा संतप्त सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. कधी आणि कुठे पाऊस होणार? त्या शहरातील हवामान कसं असणार? हे समजतं. हवामान खात्याकडून वेळोवेळी माहिती देण्यात येते. मात्र त्यानंतरही ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे सामन्याचं आयोजन का केलं जातं? असा संतप्त सवाल क्रिकेट चाहत्यांकडून या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल