Maharashtra News LIVE : मोशी येथील कचऱ्याच्या ढीगाखाली अडकलेल्या 8 जणांचा मृत्यू
Maharashtra News LIVE : वसई-विरार शहरात झालेल्या पूरपरिस्थिचा फटका शहरातील नागरिकांसह मुक्या जनावरांनाही बसला. वसईतील दत्तानी परिसरात पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या तीन गायी मृतावस्थेत आढळून आल्या. यासह देश विदेश, महाराष्ट्र, राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य चौथ्या दिवशी युद्धपातळीवर सुरू आहे. तब्बल 65 तास झाले तरी मदत कार्य सुरू आहे. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांच्या नजरा बचाव पथकांकडे लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज मुरबाड दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. मुरबाडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गौरव होणार आहे. इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या दारणा धरणात 53.67 टक्के, मुकणे धरणात 34.63 टक्के, भावली धरणात 89 टक्के, भाम धरणात 50 टक्के, वाकी धरणात 23 टक्के, वालदेवी धरणात 72 टक्के आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
मोशी येथील कचऱ्याच्या ढीगाखाली अडकलेल्या 8 जणांचा मृत्यू
पुणे मोशी इमारत दुर्घटनेत अडकेलल्या सर्वांना काढण्यात यश आले असून एकजण अडकला असून त्याचा शोध सुरु असल्याचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
-
तुळजाभवानी मंदिराबाबत एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना थेट निर्देश
तुळजाभवानी मंदिराचे सर्व कामकाज पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच करा. मंदिराची परंपरा, पावित्र्य आणि धार्मिक भावना अबाधित ठेवत भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या.” असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
-
-
शहादा येथे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा
शहादा शहरातील समाज कल्याण वस्तीगृहात विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाली असून ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डाळ भात, शेवगा, चपाती खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने दवाखान्यात करण्यात आले.
-
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 150 नवीन सीएनजी बसेस दाखल
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 150 नवीन सीएनजी बसेस दाखल झाल्या असून, या बसेसचे उद्घाटन घणसोली आगार येथे महाराष्ट्राचे वन मंत्री तथा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले, या नव्या बसेसमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे.
-
हॉटेल मालकाची हत्या, श्रीरामपूरमध्ये धक्कादायक घटना
श्रीरामपूर येथे भर दुपारी चाकूने भोसकून हॉटेल मालकाची हत्या
शहरातील नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेल येथील घटना
जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत दोघांवर केला धारदार शस्त्राने हल्ला
आकाश शेखर दुबय्या असं या हल्ल्यात मृत झालेल्या हॉटेल मालकाचं नाव
तर कुणाल दुबय्या नावाचा तरुण या घटनेत किरकोळ जखमी
जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयात करण्यात आले दाखल
-
-
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी, 10 ते 15 किलोमीटर वाहनांच्या रांगा
मुंबई – अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर ते नायगाव बाफाना ब्रिजपर्यंत १० ते १५ किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी
ठाणे घोडबंदर रोडवर सीमेंट काँक्रिटचे आज आणि उद्या १२ वाजेपर्यंत काम सुरू
रस्त्याच्या कामामुळे झाली वाहतूक कोंडी, वाहनधारकांना मोठा मनस्ताप
वाहन रस्त्यातच अडकले
-
मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ६ वर
मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ६ वर
मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात आजुन तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात NDRF ला यश
आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले
आज दिवस भरात रेस्क्यू टीम ५ मृतदेह बाहेर काढले
-
ग्राहकांच्या तक्रारींनंतर FSSAI ने स्विगी इन्स्टामार्टला 9 नोटिसा बजावल्या
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 चे उल्लंघन झाल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारींनंतर, FSSAIने स्विगी इन्स्टामार्टला नऊ नोटिसा बजावल्या आहेत.
-
पंतप्रधान आपला तीन देशांचा दौरा पूर्ण करून भारताकडे रवाना
पंतप्रधान मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा पूर्ण करून भारताकडे रवाना झाले आहेत.
-
राम मंदिरातील देणगी चोरीवर अविमुक्तेश्वरानंदांचे मोठे वक्तव्य
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती रायबरेली येथे दाखल झाले. येथे त्यांनी अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावर एक मोठे विधान केले. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना कठोरतम शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
-
एनपीपीएने रेबीज प्रतिबंधक इम्युनोग्लोबुलिन इंजेक्शनची किंमत वाढवली
राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) अँटी-रॅबीज इम्युनोग्लोबुलिन 300 IU/ml इंजेक्शन (1 ml) ची कमाल किंमत 112.19 रुपयांवरून 119.48 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) revises the maximum price of the Anti-rabies Immunoglobulin 300 IU/ml injection (1 ml) from Rs 112.19 to Rs 119.48. pic.twitter.com/aaHG39rEIO
— ANI (@ANI) July 11, 2026
-
श्रद्धा वालकर हत्या खटल्याची 20 जुलै रोजी होणारी सुनावणी रद्द
दिल्लीच्या साकेत न्यायालयात 2022च्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची 20 जुलै रोजी होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी, आफताब अमीन पूनावाला याची 20 जुलै रोजी एमएची परीक्षा असल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली होती.
-
मुंबई : लोअर ओशिवारा मेट्रो स्टेशनखाली सांडपाणी गळती, नागरिक हैराण
मनसे नेते संदेश देसाई यांनी असा आरोप केला आहे की, अंधेरी पश्चिम लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशनखाली गेल्या 8 दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. मेट्रोच्या सांडपाणी म्हणजेच सीवरेज टॉयलेटची पाईपलाईन फुटल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर घाण, सांडपाणी आणि असह्य दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, वाहनचालक आणि परिसरातील व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत. एवढेच नाही तर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. डास आणि रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
लातूर : लहान मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण
लातूर जिल्ह्यातल्या खरोळा इथं लहान मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तीन मुलांना दोरीने हात बांधून बेदम मारहाण करण्यात येत आहे. या मुलांवर शेतातल्या बोअरवेल मोटारीचे केबल चोरल्याचा आरोप आहे. या तीन मुलांना अनेकजण मारहाण करीत असताना व्हिडिओ मधे दिसत आहेत. एका मुलाला खांबाला बांधून मारहाण करण्यात येत आहे. तर दुसऱ्या दोन मुलांना एकत्र हात बांधून मारहाण करण्यात येत आहे.
-
सोलापूर : उदयसिंह देशमुख यांचे उपोषण पाचव्या दिवशी स्थगित
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उदयसिंह देशमुख यांचे आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या संवादानंतर आणि प्रशासकीय आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
-
पंढरपूर आगारासाठी राजमाता जिजाऊ बस दाखल
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगारासाठी एसटी महामंडळाकडून नव्या कोऱ्या राजमाता जिजाऊ बस देण्यात आल्या आहेत. या नव्या एसटी बसचे लोकार्पण पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
-
बोगस बियाणांनंतर आता बोगस खतांची भर
बोगस बियाणांनंतर आता बोगस खतांची भर… ऑन कॅमेरा पोते फोडले असता एका पोत्यात दगड,गोटे आणि खडी आढळली.. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमधील प्रकार..
-
पाऊस येईना म्हणून गावकऱ्यांनी गाढवाचं लग्न लावून काढली मिरवणूक
गावकऱ्यांनी गाढवाचं लग्न लावुन काढली गावभर मिरवणूक.. गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची श्रध्दा.. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील गावकऱ्यांनी लावलं गाढवाचं लग्न.. धाराशिव जिल्ह्यातील केवळ 41 टक्के क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या
-
बीडच्या परळीत बाप-लेकाला बेदम मारहाण केल्याची घटना
बीडच्या परळीत बाप-लेकाला बेदम मारहाण केल्याची घटना… आचार्य टाकळी गावात शेळके पिता-पुत्राला मारहाण…. विद्युत पुरवठ्यावरून तक्रार दिल्याचा राग मनात धरून मारहाण… मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल..
-
शाळांच्या उपाहारगृहांवर तुकाराम मुंढे यांची नजर
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील शाळांच्या कँटीन आणि मध्यान्ह भोजन केंद्रांची तपासणी सुरू होणार…. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत, तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार… एफडीएचा इशारा…
-
व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांची बोट उलटली
व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांची बोट उलटली. बोटीमध्ये 33 भारतीय प्रवासी असल्याची माहिती
-
बाबा फर्जत यांच्या घरावर कारवाई
ठाणे पोलीस आयुक्तांना गोपनीय माहिती मिळाली होती की, छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि शस्त्रसाठा ठेवण्यात आली आहे.या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. झाडतीवेळी घरात शीला साळवे नावाची महिला उपस्थित होती. दोन पंचांसमक्ष घराची झडती घेण्यात आली.झाडाझतीदरम्यान 5 कोटी 26 लाख 29 हजार रुपयांची रोख रक्कम, सहा वेपन, तलवारी, चाकू, गुप्ती तसेच सोने-चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित घर बाबा फर्जंद असं त्याचं नाव असून असून, त्यांचे मागील महिन्यात मधुमेहाच्या आजारामुळे निधन झाले आहे अशी माहिती – शशिकांत सातव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.
-
दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर वस्तू सडल्यामुळे दुर्गंधी
ठाण्यातील नौपाडा परिसरात शिवानंद इमारतीत ( स्वीगी इन्स्टा मार्ट )आउटलेट मुळे इमारत परिसरात अस्वच्छता पसरली आहे. परिसरात दुर्गंधी वाढल्याने स्थानिक नागरिकांचा संताप व्यक्त केला आहे. दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर वस्तू सडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक भाजप नगरसेवक संजय वाघुले आक्रमक झाले आहेत. खाद्य पदार्थ घरपोच वितरण करणाऱ्या आउटलेट कंपनीवरती कारवाईची मागणी भाजप नगरसेवक संजय वाघोली करत आहे.
-
शालार्थ आयडी घोट्याळ्यातील संशयित प्रशांत वाडीले न्यायालयात
शालार्थ आयडी घोट्याळ्यातील संशयित प्रशांत वाडीले याला धुळे न्यायालयात हजर केले. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी धुळे न्यायालयात हजर केले. सकाळीच राहत्या घरातून प्रशांत वाडीले याला अटक केली होती. सकाळपासून घराची झाडाझडती सुरु होती.
-
राम मंदिर चोरी प्रकरणी काँग्रेसचे सांगलीत टाळ-भजन आंदोलन
अयोध्यातील राम मंदिर देणगी चोरी प्रकरण सांगलीमध्ये काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे.सांगली मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाळ-भजन आंदोलन करण्यात आले.राम मंदिर चोरी प्रकरणाचा निषेध नोंदवत भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे,तातडीने याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी,अन्यथा काँग्रेसकडून पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.
-
लासलगाव बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवड प्रक्रियेला स्थगिती
लासलगाव बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवड प्रक्रियेला स्थगिती मिळाली.प्राधिकृत अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने निवड प्रक्रिया रद्द झाली. पुढील आदेशानंतर नव्याने निवड प्रक्रिया होणार आहे.बाजार समितीच्या 18 संचालकांना सचिवांचे लेखी पत्र देण्यात आले. पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली.
-
आमदार बोंढारकर यांच्याकडून प्रोजेक्ट मॅनेजरची कानउघडणी
नांदेडमध्ये दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्याकडून विष्णुपुरी येथील तुटलेल्या उड्डाणं पुलाची पाहणी केली. यावेळी आमदार बोंढारकर यांच्याकडून प्रोजेक्ट मॅनेजरची कानउघडणी केली. एवढी मोठी घटना घडली असतांना तुम्ही पुलाला मलमपट्टी केली. सिमेंट भरून पुलाच्या रातोरात भेगा बुजल्याने आमदार संतापले भेगामध्ये रात्री सिमेंट भरल्याचा आमदारांसमोर नागरिकांनी भांडाफोड केला. सर्वांसमोर अधिकाऱ्याला झाप झाप झापले. भूकंपाने पुलाचा भाग कोसळल्याच कारण दिल्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. केटीआयएल कंपनीच्या अधिकाऱ्यांची आमदाराकडून कानउघडणी केली.
-
लाडकी बहीण योजनेची SIT चौकशी करा-सुप्रिया सुळे
लाडकी बहीण योजनेची SIT चौकशी करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. आमचे खासदार अस्वस्थ आहेत हे पृथ्वी बाबाला कसं माहिती? काँग्रेसची सगळ्यात जास्त बाजू मांडण्याचं काम काँग्रेस पेक्षा जास्त मी केलं. पवार घराण्यात सध्या अनेक लग्न होत आहेत. पवारांची मुलांनी यावर्षी बँड वाजवण्याचे ठरवलंय. अजून एक गोड बातमी लवकरच मिळेल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
-
शरद पवारांनी कौतुक केलय त्यांचे आभार – देवेंद्र फडणवीस
शरद पवारांनी कौतुक केलय त्यांचे आभार. मोशी दुर्घटना प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केलीय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
प्रशांत वाडीले याला धुळे न्यायालयात हजर केले
शालार्थ आयडी घोट्याळ्यातील संशयित प्रशांत वाडीले याला धुळे न्यायालयात हजर केले. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी धुळे न्यायालयात केले हजर. सकाळीच राहत्या घरुन प्रशांत वाडीले याला केली होती अटक. सकाळपासून घराची सुरु होती झाडाझडती.
-
लाडकी बहीण योजनेची SIT चौकशी करा – सुप्रिया सुळे
लाडकी बहीण योजनेची SIT चौकशी करा. आमचे खासदार अस्वस्थ आहेत. हे पृथ्वी बाबाला कसं माहिती. काँग्रेसची सगळ्यात जास्त बाजू मांडण्याचं काम काँग्रेस पेक्षा जास्त मी केलं. पवार घराण्यात सध्या अनेक लग्न होत आहेत. पवारांच्या मुलांनी यावर्षी बँड वाजवण्याचे ठरवलंय. अजून एक गोड बातमी लवकरच मिळेल असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
बच्चू कडू यांनी बचकडी व्यक्तव्य करू नये – प्रवीण दरेकर
बच्चू कडू यांनी बचकडी व्यक्तव्य करू नये. गुण्यागोविंदाने महायुती म्हणून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा काम देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार करत आहेत. कारण नसताना वाद उभा करू नये असं प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडू यांना सुनावलं आहे.
-
मोशीला मी संध्याकाळी जाणार आहे – सुनेत्रा पवार
आपत्ती व्यवस्थापनाला सूचना दिलेल्या आहेत. योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. मोशीला मी संध्याकाळी जाणार आहे. मोशी इमारत दुर्घटनेमध्ये मी सतत आढावा घेत आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
-
छत्रपती संभाजीनगरमधील डॉन बाबा फरजान यांच्या बंगल्यावर गुन्हे शाखेने मोठी छापेमारी
छत्रपती संभाजीनगर शहरातील 1990 च्या काळातील तथाकथित डॉन बाबा फरजान यांच्या बंगल्यावर गुन्हे शाखेने मोठी छापेमारी केली आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजल्यापासून दिवसभर कारवाई सुरू होती. शहर पोलीस, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पडेगाव-मिटमिटा परिसरातील सुमारे एक एकर परिसरातील बंगल्याची सखोल झडती करण्यात आली. या झडतीत 5 कोटींची रोकड, 21 लाखांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांची चांदी जप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय 4 रायफल, सुमारे 500 जिवंत काडतुसे, तलवारी आणि चाकू आढळले. रोकड मोजण्यासाठी 5 काउंटिंग मशीन मागवण्यात आल्याची माहिती आहे.
-
मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी अडकलेले तीन जण रेस्क्यू टीमला दिसले
मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी अडकलेले तीन जण रेस्क्यू टीमला दिसले आहेत. त्या तिघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आठ जणांपैकी तीन जण इमारतीमध्ये टीमला दिसले आहेत.
-
मुख्यमंत्री कोणाला बनवायचा, याचे अधिकार संजय राऊतांना कोणी दिले?- गिरीश महाजन
“संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनवण्याचे अधिकार कोणी दिले? आमच्या दिल्लीच्या नेत्यांनी पक्षाचे सर्वाधिकार हे संजय राऊत यांना दिले असं वाटतं. सर्व देशाचा कारभार संजय राऊत हेच बघत आहेत असं मला वाटतं. उद्धव ठाकरे यांना देशाचे पंतप्रधान बनवत आहेत, मुख्यमंत्री पदासाठी बावनकुळे यांचं नाव घेता आहेत. कोणाला मुख्यमंत्री बनवायचा आणि कोणाला नाही असे सर्व अधिकार भाजपच्या आमच्या दिल्लीच्या नेत्यांनी संजय राऊत यांना दिले, असं मला वाटतंय. मुख्यमंत्री बावनकुळे होतील तर यात काय वाईट आहे? मला देखील संजय राऊत यांना भेटावे लागेल,” अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर दिली आहे.
-
शरद पवार ज्येष्ठ नेते, ते चांगल्याला चांगलं म्हणतात- एकनाथ शिंदे
“महायुतीचं सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. सरकारने चांगलं काम केलं तरी काही लोकं सरकारवर आरोप करतात. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमीच चांगल्याला चांगलं म्हणतात. उद्धव ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. टी-शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही,” असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
-
हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भुकंपाचे धक्के
हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 11 वाजून 23 मिनिटे यावेळी अनेक गावांना हे धक्के जाणवले. 3.5 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. भूकंपाच्या हादऱ्याने नागरिक भयभीत झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. वसमत तालुक्यातील अनेक गावांना 2017 पासून भुंकपाचे धक्के बसत आहेत.
-
कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा नागरिकांचा आरोप
कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर शेकडो नागरिक पोलीस स्टेशनला जमा झाले आहेत. नवीद मुश्रीफांसह नागरिक पोलीस स्टेशनमध्ये आहेत. या प्रकरणात अपेक्षित कारवाई न केल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत.
-
पुण्यात प्रशिक्षणादरम्यान NDA कॅडेटचा मृत्यू
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रथम सत्रातील 17 वर्षीय कॅडेटचा शारीरिक प्रशिक्षणादरम्यान अचानक कोसळल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिनव बाजपेयी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजत आहे. तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर शहरातील असल्याची प्राथमिक तपास समोर आलं आहे.
-
ऐन पावसाळ्यात कोल्हापुरातील आर के नगरमध्ये पाणीटंचाई
कोल्हापूरच्या आर के नगरमध्ये 12 दिवसांपासून पाणीपुरवठा नाही. या पाणीटंचाईमुळे नागरिक संतप्त झाले आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिक प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.
-
माऊलीच्या पालखीचं सासवडच्या दिशेने प्रस्थान
संत ज्ञानेश्वरांच्या आषाढी वारी पालखीचे आज शनिवारी सकाळी पंढरपूरकडे जाताना पुण्यातून सासवडकडे प्रस्थान झालंय. पालखीचा आळंदीहून सोहळा निघाला. त्यानंतर दोन दिवस माऊलींची पालखी ही पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला होती. त्यानंतर आज शनिवारी सकाळी सहा वाजता माऊलीच्या पालखीने सासवडच्या दिशेने प्रस्थान केलंय.
-
माऊलींची पालखी आज दिवे घाटाचा अवघड मार्ग सर करणार
यंदा दिवे घाटातील टेकडी परिसरात नागरिकांना मज्जाव. अनेक जण पालखीची विहंगम, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी, मोबाईल कॅमेरात टीपण्यासाठी, मोबाईलमध्ये सेल्फी घेण्यासाठी टेकडी वर जात असतात, मात्र त्याला ह्यावर्षी वर्षी बंदी असणार. मागील दोन वर्षांपासून घाटाचे रुंदीकरणाचे कामं चालू असल्यानं अनेक ठिकाणी डोंगर फोडण्यात आलायं, त्यामुळं डोंगरावरील माती आणि दगड ठिसूळ झाले आहेत.. ते कोसळ्याण्याची शक्यता असल्यानं, अघटित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून यंदा टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात आलायं..
-
कारणे दाखवाच्या दोन नोटीस मिळताच चौघांनी नगरपंचायतीकडे तातडीने भरले 20 लाख रुपये
केज नगरपंचायतीमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी प्रशासकीय आणि कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणात दोन तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. दोन नोटीसा मिळताच चौघांनी नगरपंचायतीच्या खात्यावर सुमारे 20 लाख रुपये तातडीने भरले आहेत. याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, चौकशी बीड येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली आहे. सध्या सर्व आरोपींचा कसून शोध सुरू असून, ते आहेत.
-
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काही वेळात दिवे घाटाची चढाई करून, घाटाच्या वरच्या टप्प्यात दाखल होणार
त्याआधी सकाळपासूनचं पालखीसोबत आलेल्या इतर दिंड्या दिवे घाटात दाखलं झाल्यात. त्यांच्या सोबत आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने दिवे घाटाचा परिसर गजबजला. माऊली, माऊलीच्या नामघोषात, भक्तिमय वातावरणात घाटाचा परिसर निघाला न्हाऊन. अवघड टप्पा पार केल्यानंतर वारकऱ्यांच्यात पाहायला मिळतोय उस्ताह
-
समाज कल्याण विभागाचे अनुदानित ट्रॅक्टर थेट सांगलीत भाडेतत्त्वावर देण्याचा उद्योग समोर
नांदेड व जालना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारे ट्रॅक्टर मध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार सांगलीच्या मिरजेमध्ये समोर आला आहे. स्वाभिमानी स्वराज्य संघटनेकडून हा घोटाळा समोर आणण्यात आला असून मिरज तालुक्यातल्या एरंडोली येथे एका एजंटकडे 11 ट्रॅक्टर आढळून आले आहेत.14 ट्रक्टर विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
देवेंद्र फडणवीस केंद्रात केले की, बावनकुळे यांच्या हातात सूत्रे येतील- संजय राऊत
संजय राऊत यांनी मोठा दावा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, 2029 नंतर मोदींचे सरकार राहणार नाही. देवेंद्र फडणवीस केंद्रात केले की, बावनकुळे यांच्या हातात सूत्रे येतील, असा मोठा दावा नुकताच संजय राऊत यांनी केले.
-
ठाण्यात झाड कोसळून महिला गंभीर जखमी
ठाण्यातील ब्रह्माळा तलाव परिसरात ६ जुलै रोजी सकाळी ८ च्या सुमारास झाड अंगावर कोसळून उथळसर येथील रहिवासी दीपा सुधीर चौधरी (वय ५७) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला, नाकाला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असून ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचारावर सुमारे ६ ते साडेसहा लाख रुपये खर्च झाला आहे.
-
संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप
वन पार्टी वन इलेक्शनमध्ये भाजपाचा अधिक रस असल्याचा गंभीर आरोप नुकताच संजय राऊत यांनी केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली देश ताब्यात घ्यायचा का? असा प्रश्नही यादरम्यान संजय राऊत यांनी उपस्थित केला.
-
जुलै महिना निम्मा उलटला तरी जळगाव जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरूच
जुलै महिना निम्मा उलटला तरी जळगाव जिल्ह्यात ३८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात भुसावळ, जामनेर, पारोळा, एरंडोल व अमळनेरमध्ये या तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई कायम आहे. जिल्ह्यात सध्या ३८ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत असून जामनेर तालुक्यात सर्वाधिक २५ टँकर कार्यरत आहेत. अधिग्रहित विहिरींची संख्या ६४ गेली असून टँकर आणि अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे.
-
परभणी – लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर दहा महिने अत्याचार
परभणी – लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर दहा महिने अत्याचार करण्यात आला. सेलू पोलीस स्टेशनं हद्दीतील ही घटना आहे. आरोपीने पीडितेला लग्न केल्याचं भासवून अत्याचार केले. आरोपीच्या कुटुंबातील दोन व्यक्तींकडून जातीवाचक शिवीगाळ करत धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. आरोपी गणेश इंगोले याच्यासह कुटुंबातील अन्य दोन व्यक्ती विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
-
मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली
मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली आहे. जव्हार फाट्यात भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला भेगा पडल्या. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे, मोठा धोका टळला. सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्त्याल बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
-
मुंबईत हृदयाचा थरकाप उडवणारी बातमी, एकतर्फी प्रेमातून तरूणाने केली 12 वीच्या विद्यार्थिनीची हत्या
मुंबईच्या कांदिवलीमधून हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एकेरी प्रेमातून एका वेड्या आशिकाने 12वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केली. तिच्या चाकूने चेहऱ्यावर 16 पेक्षा जास्त वार करण्यात आले.
हा प्रकार कांदिवली पूर्वेतील दामूनगर सातारा कॅम्पजवळच्या जंगल परिसरात घडला. तेथे 12वीची विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. आरोपीने तिच्या चेहऱ्यावर चाकूने 16 पेक्षा जास्त वार केल्याचं पोस्टमार्टममध्ये समोर आलं.
-
मोशी येथील भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य चौथ्या दिवशी सुरू
मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य चौथ्या दिवशी युद्धपातळीवर सुरू आहे. तब्बल 65 तास झाले तरी मदत कार्य सुरू आहे. अद्याप 7 ते 8 जण बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांच्या नजरा बचाव पथकांकडे लागल्या आहेत.
आता अत्याधुनिक कटरच्या मशनरीने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आलाय. आता पहिल्या मजल्याचा स्लॅबचं पाडकाम सुरु करण्यात आलंय. या स्लॅब खालीच अडकलेले आठ कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
गंगापूर धरण ७० टक्के भरले, तरीही नाशिककरांची पाणीकपात कायम
नाशिक – गंगापूर धरण ७० टक्के भरले, तरीही नाशिककरांची पाणीकपात कायम आहे. महापालिकेकडून पाणीकपात रद्द करण्यास अद्याप नकार देण्यात आला आहे. आज शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असून रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुढील पावसाचा आढावा घेतल्यानंतरच पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल.
Published On - Jul 11,2026 8:57 AM
