AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक बदल, किती सामन्यांवर परिणाम?

IPL 2026 Schedule : बीसीसीआयने 5 राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचं वेळापत्रक 2 टप्प्यात जाहीर केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयकडून 2 सामन्यांमध्ये बदल केला आहे. जाणून घ्या.

IPL 2026 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक बदल, किती सामन्यांवर परिणाम?
Cricket StadiumImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 13, 2026 | 10:37 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) रविवारी 12 एप्रिलपर्यंत एकूण 20 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. सहभागी एकूण 10 संघांनी प्रत्येकी 4-4 सामने खेळले आहेत. तर प्रत्येक संघासाठी पाचवी फेरी फार निर्णायक ठरणार आहे. त्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून (Bcci) 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकात अचानक बदल करण्यात आला आहे. वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने एकूण किती सामन्यांवर याचा परिणाम झालाय हे जाणून घेऊयात.

बीसीसीआयकडून एकूण 2 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या 2 सामन्यांची तारीख आणि ठिकाण बदलण्यात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोमवारी 13 एप्रिल रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या बदलाबाबत माहिती दिली आहे.

यंदा 19 व्या मोसमात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघातील पहिला सामना हा 26 एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्याला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार होती. मात्र आता हा सामना त्याच वेळेस मात्र वेगळ्या स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

फक्त ठिकाणात बदल

तसेच चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यातील दुसरा सामना 21 मे रोजी चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार होता. मात्र या सामन्याचं ठिकाण बदण्यात आलं आहे. सुधारित वेळापत्रकानुसार उभयसंघातील 21 मे रोजी होणारा सामना चेन्नईऐवजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे.

वेळापत्रकात बदल कशामुळे?

आगामी निवडणुकांमुळे बीसीसीआयने या 2 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सध्या 5 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. तर अहमदाबाद महानगरपालिकेसाठी येत्या 26 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा गरजेची असते. त्यामुळे 26 एप्रिल रोजी अहमदाबादमधील नियोजित सामन्यात बदल करण्यात आला आहे.

गुजरात आणि चेन्नईची 19 व्या मोसमातील कामगिरी

दरम्यान गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघांनी 19 व्या मोसमात एकूण आणि प्रत्येकी 4 सामने खेळले आहेत. गुजरातने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईला 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...