AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs LSG: हैदराबादच्या 3 विकेट पडल्यानंतर संजीव गोयंका यांच्यावर कॅमेरा, त्यांनी असं काही केलं

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी काही चालली नाही. पण लखनौ फ्रेंचायझीचे मालक संजीव गोयंका यांची कृती मात्र चर्चे राहिली.

SRH vs LSG: हैदराबादच्या 3 विकेट पडल्यानंतर संजीव गोयंका यांच्यावर कॅमेरा, त्यांनी असं काही केलं
SRH vs LSG: हैदराबादच्या 3 विकेट पडल्यानंतर संजीव गोयंका यांच्यावर कॅमेरा, त्यांनी असं काही केलंImage Credit source: PTI
| Updated on: Apr 05, 2026 | 4:23 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला. कर्णधार ऋषभ पंतने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर दुपारचा सामना असल्याने हा निर्णय अनेकांना आश्चर्यकारक वाटला. पण ऋषभ पंतला गोलंदाजीवर पूर्ण विश्वास होता आणि तसंच घडलं. सनरायझर्स हैदराबादचा डाव पावरप्लेमध्ये गडगडला. आघाडीचे तीन फलंदाज धडाधड बाद झाले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सनरायझर्स हैदराबादसाठी डोकेदुखी ठरला. त्याने अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केलं. त्यामुळे हैदराबादच्या धावगतीला ब्रेक बसला. हैदराबादचा संघ पावर प्लेच्या 6 षटकात 3 गडी गमवून फक्त 22 धावा करू शकला.

कर्णधार ऋषभ पंतने पहिलं षटक मोहम्मद शमीच्या हाती सोपवलं. त्याचा सामना करणं ट्रेव्हिस हेडला अडचणीचं गेलं. एक धाव घेतली आणि अभिषेक शर्माला स्ट्राईक दिली. अभिषेक शर्माला एक चेंडू खेळवला आणि दुसऱ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेक शर्माला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर दिग्वेश राठीने 7 धावा दिल्या आणि तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा मोहम्मद शमी आला. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेव्हिस हेडची विकेट काढली. त्यामुळे लखनौचे चाहते खूपच खूश झाले. चौथं षटक प्रिन्स यादवला दिलं आणि या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर इशानची विकेट गेली. त्यामुळे लखनौ फ्रेंचायझीचे मालक संजीव गोयंका खूपच खूश झाले.

सनरायझर्स हैदराबादची विकेट पडल्यानंतर कॅमेरा संजीव गोयंका यांच्या प्रतिक्रिया टिपत होता. प्रत्येक विकेटनंतर संजीव गोयंका आनंद साजरा करत होते. तसेच प्रार्थना करताना दिसले. हातात असलेला फोटोला नमन करताना दिसले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या रिएक्शनवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.