AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘अरे क्यूट बॉय, जरा इकडं बघ की’ वैभव सूर्यवंशीवर कोण इतकं फिदा? त्यानं मग केलं काय?

Vaibhav Suryavanshi Video: राजस्थान रॉयल्सची आन बान शान असलेला वैभव सूर्यवंशी हा चर्चेत आहे. त्याची स्फोटक फलंदाजी आणि त्याचा क्युटनेस हा चर्चेचा विषय आहे. अवघ्या 15 वर्षांच्या या खेळाडूने देशाचेच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधले आहे.

Video: 'अरे क्यूट बॉय, जरा इकडं बघ की' वैभव सूर्यवंशीवर कोण इतकं फिदा? त्यानं मग केलं काय?
आयपीएल २०२६, वैभव सूर्यवंशी Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 24, 2026 | 4:26 PM
Share

Vaibhav Suryavanshi Video: आयपीएल 2026 मधील तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. त्याची स्फोटक फलंदाजी, त्याचे शिक्षण, त्याचे वय याविषयी प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचे आहे. सूर्यवंशीला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी उसळते. तो सध्या नॅशनल क्रश नसला तरी त्या सर्व क्रश पेक्षा कम सुद्धा नाही. त्याच्या नावाची चर्चा यावेळी आयपीएलमध्ये सातत्याने होत आहे. तो सध्या फॉर्ममध्ये आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून त्याने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. त्याचवेळी त्याचा एक Video सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो टीम बसमध्ये बसलेला दिसतो. त्याला पाहताच अनेक जण हाका मारतात. पण पठ्ठ्या डोळ्यांच्या कडातून पाहत तो जणू काही झालचं नाही अशी प्रतिक्रिया देतो. हा अवघ्या काही सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अरे क्यूट बॉय, भावा, पाहा तरी

राजस्थॉन रॉयल्सचा संघ एका सामन्यानंतर स्टेडियम बाहेर पडताना दिसत आहे. संघाच्या बसमध्ये वैभव खिडकीजवळ बसलेला दिसतो. त्याला पाहताच चाहत्यांचा एक गट उत्साहित होतो. ते त्याला जोर जोराने आवाज देतात. त्याला हाका मारतात. कुणी त्याला क्यूट बॉय म्हणतंय , तर कुणी भाई म्हणून हाक मारताना ऐकू येतो. काहीजण हातवारे करून वैभवचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दिसते. वैभव या नावानेही काही जण त्याला हाक मारतात. पण वैभव एक तिरकस कटाक्ष टाकत त्यांना फार भाव देताना दिसत नाही. वैभवने सध्या त्याच्या खेळावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक दिग्गजांनी त्याला डोक्यात हवा शिरू न देण्याचा सल्ला दिला आहे.

वैभवची संपत्ती तरी किती?

वैभव सूर्यवंशी हा सध्या सर्वात हॉट टॉपिक आहे. त्याचे चाहते वैभवचे शिक्षण, त्याची शाळा, त्याचे राज्य, शहर याविषयी माहिती शोधताना दिसतात. काही जणांनी तर त्याच्या शाळेलाही भेट दिली आहे. त्याविषयीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर अनेकांना वैभवची संपत्ती किती आहे याचा इंटरनेटवर शोध सुरू केला आहे. काही अंदाजानुसार वैभवची नेटवर्थ ही 2 ते 2.5 कोटी दरम्यान आहे. घरगुती क्रिकेट, आयपीएल सामना आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याची कमाई होत असल्याचे मानले जाते. IPL लिलावात वैभवला राजस्थान रॉयल्स संघाने 1.10 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल