AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आरसीबी संघ यंदा जेतेपद राखणार का? आर अश्विनने वर्तवलं पुढच्या दोन वर्षाचं भाकीत

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आरसीबीने जेतेपद मिळवलं आहे. यंदा आरसीबीवर जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने पुढच्या दोन वर्षांचं भाकीत वर्तवलं आहे.

IPL 2026: आरसीबी संघ यंदा जेतेपद राखणार का? आर अश्विनने वर्तवलं पुढच्या दोन वर्षाचं भाकीत
IPL 2026: आरसीबी संघ यंदा जेतेपद राखणार का? आर अश्विनने वर्तवलं पुढच्या दोन वर्षाचं भाकीतImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 21, 2026 | 9:30 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची चर्चा आतापासून सुरू आहे. खरं तर दोन महिन्यांनंतरच जेतेपदाचं मानकरी कळेल. पण संघांची बांधणी आणि खेळाडूंचा फिटनेस यावरून आधीच अंदाज बांधला जात आहे. आरसीबीने आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे त्यांना यंदा जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. यासाठी आरसीबीचा संघ जोरदार तयारी करत आहे. विराट कोहलीने संघ सहकाऱ्यांना याबाबत इशाराही दिला आहे. दुसरीकडे, आरसीबी संघ जेतेपद राखेल का? असाही प्रश्न आहे. सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू आर अश्विनने आपलं मत व्यक्त केलं आहे. इतकंच काय पुढच्या दोन वर्षात काय होईल? याबाबत सांगितलं आहे. आर अश्विनच्या मते, आरसीबीचा संघ सध्या जबरदस्त आहे. त्यामुळे दोन वर्षात एक जेतेपद आरामात मिळवतील असं भाकीत वर्तवलं आहे.

काय म्हणाला आर अश्विन?

आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर विश्लेषण करताना सांगितलं की, आरसीबीचा संघ पुढच्या दोन वर्षात आणखी एक जेतेपद नावावर करू शकतो. आयपीएल जिंकणं इतकं सोपं नाही. पण त्यांच्याकडे बिल्डिंग ब्लॉक्स आणि वन टू वन रिप्लेसमेंट आहे. ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या संघातील उणीवा व्यवस्थितरित्या दूर केल्या आहेत. त्यामुळे टॉप 2 मध्ये फिनिश करण्यासाठी त्यांच्याकडे चांगला संघ आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना 28 मार्चला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होईल. या सामन्यातील कामगिरीवरून आरसीबीच्या पुढच्या कामगिरीचं आकलन केलं जाईल.

हेझलवूडच्या दुखापतीवर म्हणाला की..

हेझलवूड संघात नसल्याने आरसीबीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. दुसरीकडे, आर अश्विनचं याबाबत वेगळंच मत आहे. आर अश्विनने सांगितलं की, खरं सांगायचं तर हेझलवूडची दुखापत आरसीबीसाठी एक संधी आहे. जर आरसीबीकडे हेझलवूड नाही आणि ते सॉल्टच्या फॉर्मबाबत चिंतेत आहेत. तर ते सॉल्ट आणि बेथेल या दोघांना खेळवू शकतात. जेव्हा हेझलवूड परत येईल तेव्हा तुमच्या एक चांगली टीम असेल.

Follow Us
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!