GT vs RCB IPL 2022 Match Result: गुजरात आठवा ‘रॉयल’ विजय, विराटची लेट कट, अप्पर कट Must Watch Video

GT vs RCB IPL 2022 Match Result: आजच्या सामन्यातही तेच घडलं. सामन्यामध्ये एकवेळ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ सरस वाटत होता. पण मिलर-तेवतिया जोडीने विजय अक्षरक्ष: खेचून आणला.

GT vs RCB IPL 2022 Match Result: गुजरात आठवा 'रॉयल' विजय, विराटची लेट कट, अप्पर कट Must Watch Video
GT vs RCB
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 7:48 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघाला विजयाची सवय जडली आहे. संघ किती अडचणीत असला, तरी राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि डेविड मिलर (David miller) संकटमोचकाची भूमिका बजावतातच. आजच्या सामन्यातही तेच घडलं. सामन्यामध्ये एकवेळ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ सरस वाटत होता. पण मिलर-तेवतिया जोडीने विजय अक्षरक्ष: खेचून आणला. दोघांनी तुफान बॅटिंग केली. राहुल तेवतियाने 45 चेंडूत नाबाद 43 आणि डेविड मिलरने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. दोघांनी गुजरात टायटन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पॉइंटस टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. नऊ पैकी आठ सामने त्यांनी जिंकले असून एका मॅचमध्ये पराभव झाला आहे. विराट कोहलीने आज बऱ्याच कालावधीनंतर दमदार अर्धशतक झळकावलं होंत. पण बँगलोरच्या पराभवामुळे त्याची अर्धशतकी खेळी वाया गेली.

RCB चा संघ एकवेळ सरस स्थितीमध्ये होता, पण…

विराट कोहलीच्या 58 धावा, रजत पाटीदारच्या 52 आणि ग्लेन मॅक्सवेलच्या 33 धावांच्या बळावर आरसीबीने निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 170 धावा केल्या होत्या. गुजरात टायटन्सने चांगली सुरुवात केली होती. वृद्धीमान सहा आणि शुभमन गिलने 51 धावांची सलामी दिली. पण 95 धावांपर्यंत चार विकेट पडल्या होत्या. गुजरातचा डाव अडचणीत होता. त्यावेळी तेवतिया-मिलरने जोडीने विजयी मार्ग दाखवला. याआधीच्या सामन्यांमध्ये सुद्धा ही जोडी प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरली आहे.

विराटची अप्पर कट, कव्हर ड्राइव्ह स्पेशल इनिंग इथे क्लिक करुन पहा

विराटला अखेर सूर गवसला

मागच्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशाचा सामना करणाऱ्या विराट कोहलीने आज अखेर आपल्या बॅटने उत्तर दिलं. बऱ्याच महिन्यांपासून शांत असलेली विराटची बॅट आज तळपली. विराटच्या फॉर्मबद्दल सातत्याने शंका उपस्थित केली जात होती. आयपीएल सुरु झाल्यापासून, तर विराटच्या बॅटमधून धावा जणू आटल्या होत्या. विराट फॉर्मसाठी चाचपडत होता.

हसरंगाच्या गोलंदाजीवर मिलरची किलर SIX क्लिक करुन इथे पहा

विराटचा फॉर्म टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. कारण आगामी टी 20 वर्ल्ड कप लक्षात घेता, विराटने फॉर्ममध्ये परतणं आवश्यक होतं. अखेर आज मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात विराटची बॅट तळपली. त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याने 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यात सहा चौकार आणि एक षटकार आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.