AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK IPL Match Result: शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीने असा फिरवला सामना, स्पेशल Highlight चे VIDEO चुकवू नका

MI vs CSK IPL Match Result: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील (MI vs CSK) आजची लढत खूपच रंगतदार ठरली. या सामन्याने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावला.

MI vs CSK IPL Match Result: शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीने असा फिरवला सामना, स्पेशल Highlight चे VIDEO चुकवू नका
अटीतटीच्या सामन्या चेन्नईचा मुंबईवर रोमहर्षक विजय Image Credit source: BCCI
| Updated on: Apr 22, 2022 | 12:02 AM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील (MI vs CSK) आजची लढत खूपच रंगतदार ठरली. या सामन्याने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सात बाद 155 धावा केल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला एमएस धोनी. (MS Dhoni) मुंबई इंडियन्स (MS Dhoni) यंदाच्या आयपीएल सीजनमधला हा सलग सातवा पराभव आहे. मुंबईसाठी आजचा सामना ‘करो या मरो’ होता. कारण आजच्या विजयावरच त्यांच्या प्लेऑफच्या आशा टिकून होत्या. पण आता प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मुंबई इंडियन्स प्रमाणे चेन्नई सुपर किंग्सचा संघही या सीजनमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करतोय. त्यांचा सात सामन्यातील हा दुसरा विजय आहे. त्यांचे प्लेऑफमधील आव्हान अद्यापही टिकून आहे.

डॅनियल सॅम्सची चांगली गोलंदाजी

मुंबई इंडियन्सची आज खराब सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्येच दोन विकेट गेल्या. 23 धावात रोहित, इशान आणि डेवाल्ड तंबूत परतले होते. पण तिलक वर्माच्या नाबाद 51 धावांमुळे मुंबईला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. त्यांना चेन्नई समोर थोडी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. आज मुंबईच्या गोलंदाजांनी उजवी कामगिरी केली. फलंदाजीपेक्षा गोलंदाजी मुंबईची कमकुवत बाजू ठरली आहे. पण आजच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. खासकरुन डॅनियल सॅम्स त्याने चार षटकात 30 धावा देत चार विकेट घेतल्या.

शेवटच्या षटकात काय घडलं?

गोलंदाजांमुळेच मुंबईचं आव्हान शेवटच्या षटकापर्यंत टिकून होतं. जयदेव उनाडकटला फक्त शेवटच्या षटकात करिष्मा दाखवता आला नाही. शेवटच्या षटकात चेन्नईला 6 चेंडूत विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती.

शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीने असा फिरवला सामना VIDEO पहाण्यासाठी येथे क्लिक करा 

नेहमीप्रमाणे आजही हैदराबादच्या तिलक वर्माने जबरदस्त खेळ दाखवला. मुंबई इंडियन्सचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते, तेव्हा तिलक फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने अखेरपर्यंत खेळपट्टिवर टिकून 43 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. यात तीन चौकार आणि दोन षटकार होते. तिलक वर्मा खेळपट्टीवर टिकल्यामुळेच मुंबई इंडियन्सला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला.

तिलक वर्माची स्पेशल इनिंग पहाण्यासाठी इथे क्लिक करा

चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने आज जबरदस्त स्पेल टाकला. त्याने तीन षटकात 19 धावा देत रोहित शर्मा, इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस हे महत्त्वाचे विकेट काढले. त्यामुळेच मुंबईच्या फलंदाजांना मुक्तपणे धावा करता आल्या नाहीत. मुकेशने मुंबई इंडियन्यसचा सलामीवीर इशान किशनला ज्या चेंडूवर बाद केलं, त्याला तोड नाही. इशान अक्षरक्ष: हा चेंडू खेळताना क्रीझवर पडला.

मुकेश चौधरीचा जबरदस्त स्पेल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इशान किशन आज बॅटने विशेष कमाल दाखवू शकला नाही. मुकेश चौधरीच्या पहिल्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. पण यष्टीपाठी त्याने एक जबरदस्त झेल घेतला. डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर त्याने इनफॉर्म शिवम दुबेचा डाइव्ह मारुन झेल घेतला.

इशान किशनने घेतलेली फ्लाईंग कॅच पहाण्यासाठी इथे क्लिक करा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.