AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL playoff scenario: पंजाब किंग्सला चौथ्या स्थानावर जागा कशी मिळेल? असं आहे गणित

IPL 2026, LSG vs PBKS: आयपीएल 2026 स्पर्धेतील 68वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. हा सामना पंजाब किंग्ससाठी करो या मरोची लढाई आहे. असं असताना पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये कशी जागा मिळवेल? जाणून घ्या.

IPL playoff scenario: पंजाब किंग्सला चौथ्या स्थानावर जागा कशी मिळेल? असं आहे गणित
IPL playoff scenario: पंजाब किंग्सला चौथ्या स्थानावर जागा कशी मिळेल? असं आहे गणितImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 23, 2026 | 3:26 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत धमाकेदार सुरूवात करणाऱ्या पंजाब किंग्सची दयनीय स्थिती आहे. सलग सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्याने आता प्लेऑफमधील जागाही डळमळीत झाली आहे. स्पर्धेच्या मध्यात पंजाब किंग्स आरामात प्लेऑफमध्ये जागा मिळवेल असं वाटलं होतं. पण क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही. पंजाब किंग्सची पराभवाची मालिका सुरू झाली. त्यामुळे प्लेऑफमध्ये जागा मिळवणं आता शेवटच्या सामन्यात विजयावर अवलंबून आहे. नुसता विजय नाही तर इतर समीकरणही जुळून येणं भाग आहे. नाही तर पंजाब किंग्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पंजाब किंग्सचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 23 मे रोजी होणार आहे. हा सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. पंजाब किंग्स संघ गुणतालिकेत 13 गुण आणि +0.227 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे.

पहिलं गणित: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं तर..

पंजाब किंग्सला चौथ्या स्थानी झेप घ्यायची असेल तर सर्वप्रथम लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करणं गरजेचं आहे. पंजाब किंग्सने लखनौला पराभूत केलं तर 15 गुण होतील आणि चौथ्या स्थानावर विराजमान होईल. पण गणित इतक्यावरच थांबवणार नाही. राजस्थान रॉयल्स, केकेआरच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. कारण या दोन्ही संघांनी शेवटचा सामना गमावला तर पंजाब किंग्सला प्लेऑपचं तिकीट मिळेल.

दुसरं गणित: पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना गमावला तर…

पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना गमावला तर या स्पर्धेतून आऊट होईल. कारण पंजाब किंग्सचे 13 गुणच राहतील. त्यामुळे कोणतंच गणित लागू होणार आहे. अशा स्थितीत स्पर्धेतून गाशा गुंडाळण्याशिवाय पर्याय नाही.

तिसरं गणित: पंजाब किंग्स लखनौ सुपर जायंट्स सामना रद्द झाला तर…

पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामना काही कारणास्तव रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळतील. त्यामुळे पंजाब किंग्सचे 14 गुण होतील. पंजाब किंग्सचा नेट रनरेट राजस्थान रॉयल्सपेक्षा चांगला आहे. त्यामुळे चौथ्या स्थानी विराजमान होईल. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्स आणि केकेआरने शेवटचा सामना गमवणं गरजेचं आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला तर त्यांचा नेट रनरेट मोडणं सोपं नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...