IPL 2024 Points Table: राजस्थानची विजयाची हॅटट्रिक, पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1
IPL 2024 Points Table Latest News : राजस्थान रॉयल्सला मुंबई विरुद्ध विजय मिळवल्यानंतर मोठा फायदा झाला आहे. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचली आहे.

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 17 व्या हंगामात विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. राजस्थानने वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. राजस्थानने विजयासाठी मिळालेल्या 126 धावांचं आव्हान हे 4 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. राजस्थानने 127 धावा केल्या. रियान पराग राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रियानने नाबाद 54 धावांची खेळी केली. तर इतर फलंदाजांनी छोटेखानी पण विजयात योगदान देणारी खेळी केली.
यशस्वी जयस्वाल याने 10, जॉस बटलर 13, कॅप्टन संजू सॅमसन 12, आर अश्विन 16 आणि शुभम दुबे 8* धावा केल्या. तर मुंबईकडून आकाश मधवाल याने 3 आणि क्वेना मफाका याने 1 विकेट घेतली. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. मुंबईला या पराभवाचा मोठा फटका बसलाय. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानला चांगला फायदा झालाय. राजस्थान रॉयल्सला विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांचा फायदा झाला आहे. तर मुंबईची आणखी वाईट स्थिती झाली आहे. राजस्थान या सामन्याआधी तिसऱ्या स्थानी होती. राजस्थान या विजयानंतर अव्वल स्थानी पोहचली आहे. तर दहाव्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट आणखी वाईट झाला आहे.
| संघ | सामने | विजय | पराजय | नेट रनरेट | गुण |
|---|---|---|---|---|---|
| राजस्थान रॉयल्स | 3 | 3 | 0 | +1.249 | 6 |
| कोलकाता नाईट रायडर्स | 2 | 2 | 0 | +1.047 | 4 |
| चेन्नई सुपर किंग्स | 3 | 2 | 1 | 0.976 | 4 |
| गुजरात टायटन्स | 3 | 2 | 1 | -0.738 | 4 |
| सनरायझर्स हैदराबाद | 3 | 1 | 2 | +0.204 | 2 |
| लखनऊ सुपर जायंट्स | 2 | 1 | 1 | 0.025 | 2 |
| दिल्ली कॅपिटल्स | 2 | 1 | 2 | -0.016 | 2 |
| पंजाब किंग्स | 3 | 1 | 2 | 0.337 | 2 |
| रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 3 | 1 | 2 | -0.711 | 2 |
| मुंबई इंडियन्स | 3 | 0 | 3 | -1.423 | 0 |
राजस्थानचा विजय, चेन्नई-केकेआरला फटका
मुंबई -राजस्थान सामन्याआधी केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी होते. तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर होती. मात्र राजस्थान विजयासह टॉपला पोहचली. राजस्थानच्या विजयामुळे केकेआर दुसऱ्या आणि चेन्नई तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. तर मुंबईचा सामन्याआधी -0.925 असा नेट रनरेट होता, तो आता -1.423 इतका झाला आहे.
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि क्वेना मफाका.
राजस्थान रॉयल्स प्लेईंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल.
